🌟परभणी लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणूकी दरम्यान परिवर्तनाची लाट उसळून येईल - बोर्डीकर


🌟असे भाजपाचे लोकसभा निवणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केले🌟 

परभणी (दि.११ ऑक्टोंबर) :  आगामी लोकसभा निवडणूकी दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळून येईल असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा लोकसभा निवणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी व्यक्त केले.

            लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रमुख या नात्याने माजी आमदार बोर्डीकर यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे  मतदारसंघांतर्गत सद्यस्थितीसंदर्भात दौरे करीत आढावा घेवू लागले आहेत. जिंतूर शहरासह तालुक्याचा बोर्डीकर यांनी बैठकीद्वारे आढावा घेतला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोदराव राठोड, डॉ. पंडीतराव दराडे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, भागवतराव बाजगीर, नंदकिशोर बलोरे, अर्जूनराव बोरुळ, दत्तराव कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी नगराध्यक्ष वसंतराव शिंदे, गंगाधरराव बोर्डीकर आदी उपस्थित होते.

             या बैठकीतून बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतेवेळी, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. विशेषतः गेल्या नऊ वर्षात मोदी यांनी दमदार असे नेतृत्व करतेवेळी सर्व क्षेत्रात सर्वार्थाने विकासाची वाटचाल सुरु केली. सद्यस्थितीत जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेल्या सर्व विकास कामांसह सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणूकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून यश मिळवू, असे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या