🌟पुर्णा नगर परिषदेत 'स्वनिधी से समृद्धी' अंतर्गत शिबिराचे आयोजन....!


🌟मुख्यधिकारी युवराज पौळ यांच्या मार्गदर्शना नुसार शिबिराचे आयोजन🌟


 
पुर्णा : ग्रहनिर्माण शहरी कार्यमंत्रालय,भारत सरकार नवी दिल्ली द्वारा स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमा अंतर्गत पथ विक्रेते यांना केंद्र परस्कृत प्रधानमंत्री जिवीन ज्योती योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जण धन योजना,प्रधानमंत्री इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणी,प्रधानमंत्री मंत्री श्रम योगी मानधन योजना,एक राष्ट्र एक रेशन कार्ड,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या आठ योजनांचा लाभ देण्यासाठी पुर्णा नगर परिषद प्रशासनाने तर्फे दि.०९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत नगर परिषदेचे मुख्यधिकारी युवराज पौळ यांच्या मार्गदर्शना नुसार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज शिबिराच्या उदघाटन प्रसगी उदघाटक म्हणून नगर परिषदेचे प्रशाकीय अधिकारी श्री म्हस्के तर प्रमुख पाहूणे म्हूणन भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक गोपाळ काटोळे व महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक कचवे होते.

यावळी गोपाळ काटोळे सरांनी पथ विक्रेते यांना लोन विषयी महत्व पूर्ण मार्गदर्शन केले व कचवे यांनी देखील आपले मनोगत वक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगर परिषदचे सह प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर (DAY-NULM विभाग ) सूत्रसंचालन समुदाय संघटक पुष्पा बनसोडे तर आभार प्रदर्शन राहुल जोंधळे CLC व्यवस्थापक यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या