🌟परभणी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याचे आवाहन...!

 


🌟असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे🌟

परभणी (दि.17 ऑक्टोंबर) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहूजन कल्याण विभाग या विभागातंर्गत येणा-या विविध शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर (https:/mahadbtmahait.gov.in) भरता येणार आहेत. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरून त्या अर्जाची प्रिंट काढून ती आपल्या महाविद्यालयाकडे जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयांनी हे अर्ज प्रस्तुत कार्यालयाकडे पाठविण्यापूर्वी अर्जाची छाननी व पडताळणी करून शिष्यवृत्तीस पात्र असणा-या विद्यार्थ्यांचेच अर्ज समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवावेत. अर्जात त्रुटी असल्यास तात्काळ त्या विद्यार्थ्यांकडून पूर्तता करून घ्यावी. तसेच अभ्यासक्रमाची शुल्क मंजुरीची कार्यवाही आपआपल्या पालक विभागांकडून तात्काळ करून घ्यावी. महाविद्यालयात प्रवेशित एकही मागासवर्गीय विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. या शिष्यवृत्ती योजनेचे सर्व पात्र प्रवेशित विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या