🌟परळी तालुक्यातील हेळंब येथील घटना केवळ काल्पनिक आणि खोटी....?


🌟खोट्या गुन्हाची चौकशी करून पोलिसांनी योग्य न्याय द्यावा : नागरीकांची मागणी🌟


 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी तालुक्यातील हेळंब येथील प्रकरण केवळ काल्पनिक आणि खोटे असुन फिर्यादीने जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाची पोलिसांनी सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी नगरिकांमधून होत आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील हेळंब येथील फिर्यादी आशा होळंबे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.२९९/२०२३ ३०७, ३२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०६ अन्यवे गुन्हा दाखल आहे.  सदरील गुन्ह्यातील फिर्यादी व तिची बहीण तसेच वडील व नातेवाईक यांचा हेळंब येथील जमीन गट नं २१६ शी कसलाही संबंध नसताना मागील वर्षी सदरील जमीनतील पीक चोरून घेवून गेलेबाबत नारायण माणिक पाळवदे यांनी चोरीची केस दाखल केली आहे. सदर केस परळी न्यायालयात दाखल झालेली असून न्याय प्रविष्ठ आहे. अशा परिस्थिती केवळ नारायण माणिक पाळवदे व नातेवाईकांना त्रास देण्याचा उद्देशाने नमूद दोन बहिणी व त्यांच्या वडिलांनी आपसात संगनमत करून कोणताही गुन्हा घडलेला नसताना खोटी फिर्याद (जवाब ) देऊन सदरचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदरील गुन्ह्यामध्ये मयत लोकांचीही नावे घेतली आहेत. त्यामुळे सदरील गुन्ह्याची निपक्षपणाने चौकशी होऊन खोटी केस करणाऱ्या फिर्यादी व साथीदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या