🌟विमा कंपनीने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी - आ.डॉ.राहुल पाटील

 


🌟आ.डॉ.राहुल पाटील यांनी नुकसान ग्रस्त पिकांची केली पाहणी🌟

परभणी : परभणी जिल्हा व तालुक्यात या वर्षी पाऊस अत्यल्प प्रमाणात झाला आहे. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. त्यानंतर पिकांसाठी आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने सोयाबिनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यातच भरीस भर म्हणजे जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोज्याक रोगाने सोयाबीन पीक शंभर टक्के नष्ट झाले आहे. त्यामुळे पिक विमा कंपनीने १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी. तसेच शासनाने युध्द पातळीवर तात्काळ पंचनामे करून शेतकºयांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी आ.पाटील यांनी  परभणी तालुक्यातील मिरखेल, तट्टु जवळा, पिंगळी शिवारातील पीक पाहणी दरम्यान केली.

परभणी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतू यंदाच्या हंगामात कमी पाऊस झाल्याने सोयाबीनवर अनेक रोग पडले आहेत. हाताशी आलेल्या सोयाबीनवर पावसाअभावी येलो मोज्याक हा रोग पडला आहे. त्यामुळे शेंगा वाळून गेल्याने शेतकºयांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी रविवार, दि.८ आॅक्टोबर रोजी परभणी तालुक्यातील मिरखेल, तट्टूजवळा, पिंगळी या शिवारामध्ये केली. यावेळी तहसीलदार राजापुरे, तालुका कृषी अधिकारी काळे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख नंदकुमार अवचार, कृउबा सदस्य अरविंद देशमुख, युवासेना तालुका प्रमुख संदीप झाडे, पिक विमा कंपनीचे व्यवस्थापक किशोर वळसे, तलाठी श्रीमती राठोड, मिरखेल सरपंच दिगंबर थोरवट, बाळासाहेब देशमुख, प्रभाकर देशमुख, आबासाहेब देशमुख, शिवाजीराव देशमुख, भारत कनकुटे, कैलास देशमुख, माऊली मोरे, शरद देशमुख, नागनाथ देशमुख, राम कदम, रावसाहेब देशमुख, व्यंकटराव देशमुख, रविकांत देशमुख व असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार पाटील यांनी नुकसान झालेले सोयाबीन पीक संबंधीत अधिकाºयांना दाखवत शेतकºयांशी नुकसानीबाबत चर्चा केली. यावेळी आ. पाटील म्हणाले की, नुकसानीची तीव्रता भयंकर असून शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास यलो मोजॅकने या रोगाने हिरावून घेतला आहे. पिक विमा कंपनीने २५ टक्के अग्रीम रक्कम जाहीर केली आहे. परंतू १०० टक्के नुकसान झाल्याने १०० टक्के नुकसान भरपाई पिक विमा कंपनीने द्यावी अशी मागणी आ.पाटील यांनी केली. तसेच शासनाने विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकºयांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आ. पाटील यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या