🌟या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष व युवकांनी सहभाग नोंदविला होता🌟
पुर्णा : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी काल बुधवार दि.०४ ऑक्टोबर २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील चार ते पाच गावांतील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुर्ण तहसिल कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष व युवकांनी सहभाग नोंदविला होता.
जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवेली येथे मागील काही दिवसापूर्वी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणासह धरणे आंदोलन करण्यात आले होते या उपोषणांमध्ये राज्य सरकारला एक महिन्याची सवलत देण्यात आली असून एक महिन्यानंतर पुन्हा आंदोलन उपोषण सुरू होणार आहे त्यामुळे जनजागृती व तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 4 ऑक्टोबर रोजी पूर्णा तालुक्यातील नावकी माटेगाव सुरवाडी पिंपळगाव आहेरवाडी या भागातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पूर्णा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला नावकी पाटी येथून निघालेला मोर्चा माटेगाव इथूनशहरातील पॉईंट येथून शहरातील मुख्य रस्त्याने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा दोन्ही रेल्वे उड्डाणपूल घालून तहसील कार्यालयामध्ये नेण्यात आला या मोर्चामध्ये एकूण जवळपास 60 ते 70 ट्रॅक्टर असं या चारही गावच्या पुरुष महिला युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी मोर्चेकर यांच्या वतीने तहसीलदार यांना पाच गावातील सकल मराठा समाजाच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावी आंतरवेली जिल्हा जालना येथे उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे मराठवाड्यातील सर्व समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार पुर्णा यांना सादर करण्यात आले या मोर्चामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग मोठा होता जवळपास पाच किलोमीटर अंतर पायी चालू सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाला होता सकल मराठा समाजाच्या मोर्चाच्या ठिकाणी पुर्णा व चुडावा पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता
0 टिप्पण्या