🌟यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांनी आंदोलन स्थळावरून दवाखान्याची वाहने जाण्याकरिता एकोप्याने मार्ग काढून दिला🌟
परभणी (प्रतिनिधी) - परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या फरकंडा येथील हनुमान चौकात मराठा आरक्षणासाठी मंगळवारी रास्ता रोको करण्यात आला.यावेळी पालमचे पोलिस निरीक्षक गाडेवाड ,दिनेश सूर्यवंशी, बेदे, तिडके,येसुरकर व महसूल मंडळ अधिकारी अहिल्या आतकरे ,तलाठी वैजेनाथ आमदरे हजर होते फरकंडा येथील हनुमान चौक वाहतुकीच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा चौक मानला जातो. परभणी-पालम हा मुख्य रस्ता चौकातून जात असल्याकारणाने रास्तोरोमुळे येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व रस्ता सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाला बरीचशी कसरत करावी लागली. तसेच आंदोलकांनी आंदोलन स्थळावरून दवाखान्याची वाहने जाण्याकरिता एकोप्याने मार्ग काढून दिला. मराठा समाज हा शांतताप्रिय समाज आहे असे आंदोलन कर्त्यांनी दाखवून दिले. राज्य शासनाने मराठा आरक्षणावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणार एक मराठा कोटी मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला.रास्ता रोकोसाठी फरकंडा, गुळखंड, जवळा, डिग्रस, फळा, घोडा, ऐनवाडी या गावातील नागरिकांनी पूर्ण सहकार्य केले....
0 टिप्पण्या