🌟मंगरूळपीर ग्रामीण रूग्नालयातील आयुषचे सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी बेमुदत संपावर...!


🌟राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी (आयुष) वैधकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात🌟


फुलचंद भगत

वाशिम :- एनएचएम राष्ट्रीय संघटना वैधकिय अधिकारी आणी कर्मचारी यांनी विविध मागण्या पुर्ण होणेसाठी दिनांक २८/१०/२०२३ पासून मंगरूळपीर ग्रामीण रूग्नालयातील संपूर्ण राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी वैधकिय अधिकारी व कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सदर आंदोलन बेमुदत आहे. वरिल संपाबाबत वरिष्ठ मा. आयुक्त, रा. आ. अ. मुंबई व मा. मंत्री महोदय, आरोग्य विभाग यांना याआधीच पूर्वसूचना दिलेल्या आहेत असेही निवेदनात नमुद आहे.

             महाहाराष्टाचे आरोग्यमंत्री यांना माहे डिसेंबर २०२२ पासुन अनेकदा विविध संघटना व्दारे विविध जिल्हयात भेटून निवेदन देण्यात आले असून माहे मार्च २०२३ व जुलै २०२३ ला आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.आरोग्यमंत्री यांनी ३१ मार्च २०२३ पुर्वी कंत्राटी कर्मचारी समायोजन बाबत धोरणात्मक

निर्णय घेण्यात येईल असे सभागृहात सांगीतले, तरीही आज पर्यंत कंत्राटी कर्मचारी संघटनाना समायोजनाबाबत चर्चेस बोलविण्यात आले नाही.नुकतीच WHO - जागतिक आरोग्य संघटनेव्दारे कोरोना पेक्षा २० पटीने घातक व्हायरस चे आगमन होणार असल्याचे सुतोवाच केले असून जागतिक महामारी येणार असल्याचे म्हटले आहे. तरीही कोरोना काळात रुग्ण सेवेचा अनुभव असलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्याने अतितात्काळ सेवेत समायोजन करण्याबाबत शासन निर्णय करण्यात यावा.दि. १६ ऑक्टोबर २०२३ पुर्वी शासनाने समायोजन बाबत भुमिका जाहिर करावी अन्यथा दि. १६ ऑक्टो २०२३ पासुन आरोग्य सेवा विभागात कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी साखळी उपोषणास बसतील असा ईशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.सदर निवेदनावर डाॅ.सय्यद अजमल,डॉ. प्रीती तिडके,सीमा कांबळे,महेश बारगजे,स्वाती राऊत,पूनम नाकट,नम्रता जोशी,प्रियंका सुर्वे,सुषमा बिकट,शिल्पा तायडे,ममता कोटे,सुवर्णा पाटील,किरण भगत,अविनाश अवसारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या