🌟मराठा आरक्षण प्रश्नी नरेश जोगदंड यांनी दिला प्रहार जनशक्ती पक्षाच्या उप जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा...!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या फलकालाही फासले काळे🌟


पुर्णा :- गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने उपोषणासह विवीध आगळीवेगळी आंदोलन पुकारुन सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारचा धिक्कार केला जात आहे. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी तर आपले संपूर्ण आयुष्यच समाजाप्रती समर्पित केले आहे. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला पन्नास टक्याच्या आत मराठा कुणबी आरक्षण मिळण्यासाठी स्वतःच्या हिश्याची जमीन विकूण उपोषण व ईतर आंदोलने लोकशाही मार्गाने केली. त्याचबरोबर अंतरवाली सराटी येथे तब्बल सतरा दिवस प्राणांतीक अन्नपाणी त्यागाचे उपोषण केले.

त्यावेळी पोलीसांनी निर्दयीपणे अमाणूष लाठीहल्ला गोळीबार अश्रुधुराच्या नळकांड्यड फोडुन जनावरावर काठ्या घालाण्यागत महिला पुरुष मुलबाळ जखमी केले. असे घडले असताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाची मुदत देवून उपोषण सोडवले.तत्पूर्वी अंतरवालीत कोटय़वधी मराठा समाज एकवटू न ऐतिहासीक असी रेकार्ड ब्रेक सह घेवून आरक्षण प्रश्नी मार्गदर्शन केले. दिलेले चाळीस दिवस संपूनही सरकारने आरक्षण जाहीर केलेच नाही.त्यामुळे गेल्या ‌चार दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पून्हा उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठींबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील गावावात राजकिय पुढारी तथा लोकप्रतिनिधींना गावबंदी फलक लावून बंदी तसेच साखळी उपोषणे सुरु झाली.या शांततेच्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघत आहे.सगळीकडे मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा बांधव एकजुट होवून समर्थन दिले जात आहे.आता एकच लक्षण मराठा आरक्षण,या ब्रिद वाक्या खाली मराठा समाज लढतो आहे. याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्हा पुर्णा तालूक्यातील गौर येथील रहिवाशी नरेश उद्धवराव जोगदंड पाटील यांनी आपल्या प्रहार जनशक्ति पक्षाचा उपजिल्हाप्रमुख पदाचा चक्क राजीनामा हा पक्षप्रमुख माजीमंत्री बच्चू भाऊ कडू यांना पाठवून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला आहे.शिवाय गावातील प्रहारच्या फलकाला काळे फासून आरक्षणाप्रती एक मराठा कोटी मराठा, च्या घोषाणा देण्यात आल्यात. या त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकिय तथा सामाजीक क्षेत्रात एकच खळबळ उडाल्याचे पहावयास मिळत आहे.प्रहारचे नरेश अण्णा जोगदंड पाटील हे शेतकरी प्रश्नानावर नेहमीच आगळीवेगळी आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधून न्याय शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात नव्हे या कामी सर्वपरिचित आणि वाक‌्बगार आहेत. आता त्यांनी नुकताच प्रहार जनशक्ति पक्षाच्या पदाचा त्याग करुन मराठा आरक्षण प्रश्नी ऐल्गार पुकारण्यासाठी आपल्या आंदोलनाची धार अधिक प्रभावी केल्याचे स्पष्टं होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या