🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयात सामान्य ज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न....!


🌟स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे शालेय शिक्षण होय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे - प्रा.परमेश्वर वांगकर


🌟जिवनात यशस्वी होण्यासाठी सत्य व अहिंसा  यांचा अवलंब करावा लागेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल - हिराजी भोसले सर


पुर्णा (दि.०३ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील सुहागन येथील आदर्श शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी राजे विद्यालयात नुकतीच राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त संस्कार व सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचे बक्षीस वितरण आज मंगळवार दि.०३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०१-०० वाजता करण्यात आले या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री हिराजी भोसले सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यशोदीप अकॅडमी परभणीचे संचालक श्री.प्रा.परमेश्वर वांगकर संदिप भोसले पत्रकार व संपादक दिनेश चौधरी उपस्थित होते.


 महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री संस्कार सामान्य ज्ञान ही परीक्षा १२० गुणांची घेण्यात आली होती यापैकी इयत्ता ०५ वी  मधून सिद्धी भोसले, इयत्ता ०६ वी  मधून गंगाधर डांगरे,ज्ञानेश्वरी सारंग तर इयत्ता ०७ वी मधून नारायण भोसले, इयत्ता ०८ वी  मधून प्रसाद भोसले,सृष्टी वाघमारे, इयत्ता ०९ वी  मधून चैताली गडगिळे व गंगाधर आसोरे, इयत्ता १० वी मधून प्रतीक्षा भोसले व संचिता भोसले यांनी सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये यश संपादन केले यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


यावेळी विद्यार्थ्यांना यशोदीप अकॅडमीचे संचालक प्रा.परमेश्वर वांगकर यांनी विद्यार्थ्यांशी यावेळी मार्गदर्शनपर संवाद साधला यावेळी बोलताना प्रा वांगकर म्हणाले की स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे शालेय शिक्षण होय विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे वर्गात शिकवत असताना शिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजे व रविवारी सुद्धा अभ्यास केला पाहिजेत स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही तुम्ही या देशांचे उद्याचे भवितव्य आहात तुम्हाला मोठें अधिकारी व्हायचे असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे असे ही ते यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुंज साधतांना म्हणाले.


 त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष हिराजी भोसले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले महात्मा गांधीजींनी पाच तत्त्वे सांगितले आहेत जीवनात यशस्वी होण्यासाठी सत्य व अहिंसा  यांचा अवलंब करावा लागेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांनी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे विद्यार्थ्यांनी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांचा आदर्श घ्यावा असे त्यांनी सांगितले त्याचबरोबर चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या मुलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एम.जी.कल्याणकर,दौलत भोसले,जि.ए.भागवत,जी.एस.वाघमारे,हि.पी.सावंत,बि.इ.दैफळे,एम.बी.कदम,एस.एच.सारंग,विठ्ठल सारंग,संदेश अरबाड,जि.पी.गायकर जाधव मॅडम व भोसले मॅडम यांनी परिश्रम घेतले.....



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या