🌟घटनेतील ०५ जणांच्या विरोधात गुन्हें दाखल🌟
परभणी : परभणी येथील असोला येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात दैनंदिन शासकीय कामकाज सुरु असतांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यावर शाई फेकल्याची गंभीर घटना घडली अचानक कार्यालयात दाखल झालेल्या पाच जनांनी अधिकार्यावर शाई फेकल्याबद्दल ०५ जणांच्या विरोधात पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून असोला ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्यामुळे सदरील गुन्हा ताडकळस पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की गंगाधर यादव,राजू वानरे, रिझवान शेख व अन्य दोघे असे एकूण पाच जण उपप्रदेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्या कक्षात दाखल झाले. त्या कामात मग्न असतांना त्यांच्या डोळ्यावर टेबलावर आणि कागदपत्रांवर शाई फेकली. या प्रकाराने या कार्यालयात गोंधळ उडाला. दरम्यान, अधिकारी अश्विनी स्वामी यांनी ताडकळस पोलिस स्थानकात पाच जणांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोघांना ताब्यात घेतले आहे.
परिवहन कार्यालयात कंत्राटी कर्मचार्यांना मुदत संपल्यानंतरसुध्दा अनाधिकृतपणे शासकीय कामे करवुन घेतली जात असल्याचा आक्षेप या पाच जणांनी घेतला होता, अशी माहिती हाती आली असून ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीत शासकीय गौण खनिज अवैध रेती/दगड गिट्टी/मुरुम उत्खनन व तस्करी तसेच अवैध देशी विदेशी दारु विक्री व इतर अवैध व्यवसाय वाढल्याने सातत्याने गंभीर गुन्हें घडत असल्याचे परिसरातील जनसामान्यांतून बोलले जात असून हत्या,अपहरण,हत्येचा प्रयत्न चोऱ्या पत्रकारांना धमक्यांसह मानसिक छळाचे देखील प्रमाण वाढल्यामुळे वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसत आहे आतातर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांच्यावर शाई फेकण्याच्या झालेल्या गंभीर घटनेमुळे प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी देखील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत सुरक्षित नसल्याचे दिसत आहे.....
0 टिप्पण्या