🌟बुद्ध विहारात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होणार🌟
पुर्णा (दि.२२ ऑक्टोबर) - अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो पूज्य भदंत पयावांश यांच्या प्रमुख मार्गदर्शन खाली दिनांक २४ ऑक्टोबर या दिवशी धम्म चक्र अनुप्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ११-०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या हस्ते बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येणार असून तत्पूर्वी.सकाळी १०-०० वाजता बुद्ध विहारात भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण तर दुपारी १२-०० वाजता सामूहिक बुद्ध वंदने नंतर बुद्ध विहार पुर्णा येथून महामानव तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची शहरातील मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून समारोप जाहीर धम्म सभे मध्ये होणार आहे.
सभेचे अध्यक्ष प्राचार्य मोहनराव मोरे (माजी नगराध्यक्ष पूर्णा) प्रमख धम्म देशना भदंत पयावांश बुद्ध विहार पूर्णा सभे नंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार झी युवा फेम रविराज भद्रे यांचा भिमबुद्ध गित गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न होईल वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान धम्म चक्र अनुप्रवर्तन सोहळा समिती बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व धम्म सेवेत कार्यरत असलेल्या महिला मंडळांनी केले आहे.....
0 टिप्पण्या