🌟महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे🌟
भागवत संप्रदायातील एक प्रसिद्ध संकल्पना ज्यामध्ये पौराणिक कथा संगीताच्या माध्यमातून सांगितली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार म्हटले जाते. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो. नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. त्याविषयींची चटकदार व ज्ञानवर्धक माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींच्या या लेखात आवर्जून वाचाच... संपादक.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते. शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या आरंभ- कीर्तन हा शब्द संस्कृतात "कॄत्" या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची कीर्तनाची गादी होय. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या. कीर्तनाचा इतिहास- भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. पुढे ती मराठीत रूजली-
"संस्कृताचि गाठी।
उघडोनी ज्ञान दृष्टी॥
केलीसे मराठी।
गीता देवी॥"
वस्तुतः श्रीहरिकीर्तन खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजी महाराजांच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले. नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन- महर्षी व्यासानी सुरू केलेले, असे दोनच कीर्तन प्रकार होते. एक संगीत- नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
श्रीमद्भगवद् गीतेत नवविधा भक्तीमध्ये कीर्तन ही एक भक्ती असल्याचे वर्णन आहे. नऊ प्रकारांपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे. कीर्तनाचे गुण संकीर्तन, नामसंकीर्तन, कथा संकीर्तन असे विविध प्रकार आहेत. "कीर्त" या संस्कृृत शद्बावरून कीर्तन हा शब्द आला आहे. पवित्र भगवतगीता ग्रंथराज हा भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण संपूर्ण भारतातील कीर्तनात थोडा फार बाह्यरूपात बदल झाला, तरी त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे, मात्र महाराजांनी मानधन घेवू नये. कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद् भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे-
"श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्!
अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!"
अशा ९ भक्तींपैकी एक आहे. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असले, तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तन करण्याचा प्रघात आहे. कीर्तनकार कथा सांगत असल्याने त्यांस कथेकरीबुवा असेही म्हणतात. संतशिरोमणी नामदेवजी महाराज म्हणतात-
"गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी।
ब्रह्मानंद लहरी प्रकट केली।।
अध्यात्म विद्येचे लाविलेसे रोप।
चैतन्याचा दीप उजळीला।।
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव।
भवार्णवी नाव उभारीली।।"
कीर्तनाची अंगे- वारकरी कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग नसतात. संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण अशा पद्धतीचे आणि टाळ मृदुंगाच्या घोषात २०-२५ साथीदारांसोबत वारकरी कीर्तन सादर केले जाते. वारकरी कीर्तनाची परंपरा खूप पुरातन आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी चंद्रभागेच्या काठावर आणून जनसामान्यांना खुले करून एक नवी परंपरा सुरू केली. वारकरी कीर्तन हे आळंदी येथे वारकरी महाविद्यालयात शिकविले जाते. या माधमातून संतानी भक्तीमार्ग शिकविला. संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला. वारकरी कीर्तन ही सांस्कृृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली-
"नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग।
जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग॥"
(पवित्र श्रीसकल संतगाथा)
रामदासी कीर्तन- रामदासी कीर्तन परंपरा ही समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केली. रामदासी कीर्तन हे मुख्यतः समर्थांच्या रचनांवर आधारीत असते. आख्यानेसुद्धा रामकथा आणि रामभक्ती यावरच मुख्यतः आधारीत असतात. श्रीधरस्वामी, केशवस्वामी, रंगनाथ स्वामी अशा रामदासी परंपरेतील संतांच्या रचना आणि पदे यांचाही समावेश केला जातो. रामदासी कीर्तन हे आजही परंपरागत गुरुकुल पद्धतीनेच शिकविले जाते. कीर्तनांचे आधुनिक प्रकार- १) संयुक्त कीर्तन, २) जुगलबंदी कीर्तन, ३) राष्ट्रीय कीर्तन, ४) वैज्ञानिक कीर्तन असे अनेकानेक आढळून येतात. कीर्तन आणि पदे- पदांबद्दल इतर सर्वसाधारण विश्वकोशीय माहिती या विभागात लिहावी. ज्या कीर्तनकारांच्या मृत्यूस ६१पेक्षा अधिक वर्षे झाली असतील, अशा कीर्तनकारांची पदे जशीच्या तशी विकिस्रोत या बंधुप्रकल्पात जतन करतात. कीर्तन आणि संगीत- पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेऊ लागले. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात. ग्रामीण भागात कीर्तन परंपरा जपली जात आहे, हे अभिमानास्पदच!
"नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी।।"
- संतचरणरज -
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.
0 टिप्पण्या