🌟ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील उखळद येथील युवकाचा पालम तालुक्यातील नदीपात्रात बुडून अकस्मात मृत्यू की निर्घृण हत्या ?

 


🌟 घटनेतील संशयित आरोपींवर कारवाई होत नसल्यामुळे मयताच्या पित्याची जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांकडे धाव🌟

परभणी/पुर्णा (दि.१० ऑक्टोंबर) - परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मौजे उखळत हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून मागील मे महिन्यामध्ये २७ मे २०२३ रोजी मध्यरात्री ०३-०० वाजेच्या सुमारास आपल्या मोटरसायकलवर पाळीव वराह शोधण्यासाठी निघालेल्या अल्पसंख्यांक सिख सिखलकरी समाजातील अल्पवयीन तीन मुलांना गावातील गावकऱ्यांनी चोर समजून कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अमानुषपणे हातपाय बांधून बेदम मारहाण करीत यातील एका चौदा वर्षीय बालकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेला अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा एकदा पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस स्थानकाच्या हद्दीतील उखळद गाव एका २५ वर्षीय अल्पसंख्यांक समाजातील युवकाच्या संशयास्पद मृत्यूने चर्चेत आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की उखळद येथील सय्यद इब्राहिम सय्यद अली यांचा २५ वर्षीय मुलगा सय्यद मुदस्सीर सय्यद इब्राहिम हा दि.०४ ऑक्टोबर २०२३ रोजी उखळद येथून त्यांच्या राहत्या घरातून बाहेर पडला परंतु तो परत घरी आलाच नाही याबाबत ०४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १०-०० वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईल फोनवर फोन केला असता तो बंद होता त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रात्रभर शेतात व परिसरात त्याचा शोध घेतला तरी देखील तो गावात मिळाला नाही व आसपास पण त्याचा पत्ता लागला नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातीलच एका पान टपरीवर जाऊन कुटुंबातील सदस्यांनी मुदस्सीर संदर्भात चौकशी केली असता पान टपरी वाल्याने माहिती दिली की रात्री मुदस्सीर हा त्यांच्या पान टपरीवर आला होता व येथून मुरकुलचा पुडा घेऊन त्याच्या मित्रासोबत गेला याबाबत त्याच्या मित्राला मोबाईल फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रात्री मुदस्सीर माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत आला होता परंतु नंतर कुठे गेला माहित नाही तसेच गावातच राहणारा फिर्यादीचा भाऊ सय्यद खाजा सय्यद अली यांच्या घरासमोर मुदस्सीर,सय्यद अलीम व सय्यद कुदरत हे तिघेजण बोलत उभे असताना गावातीलच दोन व्यक्ती याठिकाणी आले व त्यातील एकाने मुदस्सीर यास उद्देशून तुला गावचे सरपंच बोलवीत आहेत असे सांगितले त्यानंतर मुदस्सीर हा त्या दोघा सोबत गेल्याचे सय्यद खाजा व सय्यद अलीम यांनी पाहिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुर्ण दिवस व रात्रभर कुटुंबातील सदस्यांनी मुदस्सीरची शोधाशोध केली परंतु मुदस्सीरचा शोध न लागल्यामुळे दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी ताडकळस पोलिस स्थानक येथे सय्यद मुदस्सीर बेपत्ता असल्याबाबत मिसिंगची फिर्याद नोंदवली त्याच दिवशी सायंकाळी पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना फोन आला व त्यांना एक संशयित मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले व पालम येथे येऊन आपण मृतदेहाची ओळख पटविण्याची सूचना दिली असता त्यानंतर मुदस्सीरचे कुटुंबीयांनी पालम येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवलेला मृतदेह पाहिला असता त्यांनी मृतदेह आपला मुलगा मुदस्सीर याचाच असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मृतदेह बघितला असता त्यांना मुदस्सीरच्या छातीवर पोटावर शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा दिसून आल्या रात्र झाली असल्यामुळे मृतदेहाची उत्तरीय तपासणी (शवविच्छेदन) दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात येईल असे त्यांना पालम ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी मयत मुदस्सीरच्या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित पोलिसांना संबंधित घटने संदर्भात संशयित आरोपींना अटक केल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका घेत आक्षेप घेतला परंतू उपविभागीय पोलीस अधिकारी पुर्णा यांनी मध्यस्ती करत सदरील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता उखळद येथील कब्रस्तानामध्ये दफन विधी करण्यात आला याप्रकरणी तीन दिवस होऊनही याबाबत आरोपींवर कुठलीच फिर्याद नोंद झाली नसल्यामुळे मुदस्सीर यांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांच्याकडे धाव घेऊन सर्व प्रकार निवेदनाद्वारे कळवला व संबंधित संशयित व्यक्ती हे ताडकळस परिसरातील वाळूमाफिया असल्याने गुन्हा नोंद होत नाही का काय ? असा गंभीर प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे. संबंधित आरोपींवर लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी कुटुंबियांकडून केली जात असून या प्रकरणी मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळेल का नाही याकडे संपूर्ण परभणी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या