🌟शासकिय तंञनिकेतन महाविद्यालयात मागास विद्यार्थीनिच्या अधिव्याख्याता नेमनुकीत दुजाभाव....!



🌟जिल्हाधिकारी कार्यालयाची तक्रारीबाबत लेटलतीफशाही : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाकडे दाद मागणार🌟

फुलचंद भगत

वाशिम:-अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवीत तिसऱ्या मेरीट असलेल्या मागास उमेदवाराची शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील  नेमणूकीत झालेल्या अन्यायाची वाशीम जिल्याधीकाऱ्याच्या पत्राची एक महिना  दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी परत पत्र देऊन अहवाल मागीतला  असून या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्या वाशीम दौऱ्यात हा मुद्दा उचला जाणार आहे.

    शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय वाशीम मधील विभाग प्रमुख आणि निवड समितीने नियमबाह्य कार्यवाही करुन  चालू शैक्षणिक वर्षात तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता म्हणून नेमतांना पात्रता आणि लायकी विचारात न घेता केवळ आपल्या जवळच्या कमी गुणवत्ता असणाऱ्या उमेदवाराची नियुक्त्या केल्या  असून  त्या बाबत तक्रार दाखल करूनही येथील प्राचार्य काडीने औषध लावण्याचाच प्रकार करीत तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.


  शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय वाशिम मध्ये मागील दिड वर्षापासुन अस्थाई स्वरुपात तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता या पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदार महिला कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शासकिय तंत्रनिकेतन विद्यालय वाशिम मध्ये सन २०२१ - २०२२ मध्ये दिलेल्या जाहिराती नुसार त्या दि. १४/०२/२०२२ नुसार त्यांची मुलाखत देवुन  सेवा देण्यासाठी गुणवत्ताघरक शिक्षीका म्हणुन निवडल्या गेली तेव्हापासुन त्या शासकिय तंत्रनिकेतन विद्यालयामध्ये तासिका तत्वावर तेव्हाच्या कमी मानधनात मागील दिड वर्षापासुन सतत व अविरत सेवा आदेशाप्रमाणे नियमित करुन दिलेली आहे व मागील सेवा ही कायम ठेवलेली आहे. त्यादरम्यान शासकिय तंत्रनिकेतन वाशिम येथुन यावर्षी सन २०२३ - २४ करीता पात्र व इच्छुक उमेदवाराकडुन माहिती तंत्रज्ञान शाखेत तासिका तत्त्वावर  अधिव्याख्याता पदासाठी मुलाखती बद्दल दि. ११/०७/२०२३ जाहिरात दैनिकात प्रसिध्द करण्यात आली त्यामध्ये  ही मागासवर्गीय महिला एक उमेदवार म्हणुन मुलाखत देण्यास हजर होती सदर अर्जात  त्यांनी  गणुवत्ता लिहीलेली असुन  (B.E., M.E. तीसरा मेरीट) आहे व  त्या महीला उमेदवारां कडे मागिल ५ वर्ष ३ महिने शिक्षणाचे अनुभव आहे. त्यांच्या समावेत या मुलाखतीत आणखी  तीन उमेदवार सुध्दा उपस्थित होते त्यानुसार  आपली मुलाखत अतिशय चांगल्या प्रकारे झाली असुन त्याबाबत मला गुण सुध्दा मिळालेले आहेत,परंतु त्यांची नियुक्ती झालेली नाही त्याऐवजी कमी गुणवत्ता (B.E.) व कमी अनुभव असलेल्या शिक्षकेस प्राधान्य दिल्या गेलेले आहे आणि निवडलेल्या उमेदवारापेक्षा जास्त शिक्षणाचा अनुभव असुन  पदव्युत्तर पदवी  अमरावती विद्यापीठात तिसऱ्या मेरीट  मध्ये पास असून देखील त्या उमेदवारापेक्षा जास्त शिक्षीत असून का डावलण्यात आले हे काही समजले नाही.

  सदर उमेदवार महिला अमरावती विद्यापीठात एम.,ई.च्या पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात तीसरी मेरीट आली असून या पूर्वी तीला या महाविद्यालयाने तासिका तत्त्वावर अधिव्याख्याता म्हणून काम करण्यासाठी नियुक्ती केली होती.उलट सोबत ची महीला उमेदवार  केवळ संबंधीत विषयात पदवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र या वर्षी तक्रारकर्त्या मागासवर्गीय उमेदवारास डावलून कमी शिक्षण व अनुभव कमी असताना झालेली निवड ही अन्याय कारक बाब आहे.

या बाबत सदर उमेदवार यांनी प्राचार्या कडे तक्रार केली पण त्याची एक प्रत मा. जिल्हाधिकारी वाशीम यांना देखील देण्यात आली होती  त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास पत्र देऊन कार्यवाही चा अहवाल मागितला होता.

त्यावर एक महिना उलटून ही उत्तर न मिळाल्याने आता परत पत्र देऊन तातडीने अहवाल मागितला आहे.

 ११ आक्टोंबर ला महिला आयोग आपल्या दारी जनसुनावनी साठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर वाशीम ला येत आहेत तेव्हा ही तक्रार त्यांचा समोर प्रत्मक्ष भेटून मांडण्यासाठी मालेगाव च्या प्रथम नगर पंचायत अध्यक्ष मिनाक्षी सावंत  यांनी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे तक्रारदार महिला उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांची साथ मिळणार असल्याने आपल्याला न्याय मिळेल आणि पूर्वलक्षीप्रभावाने नियुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मां.जिल्हाधीकारी यांनी  लक्ष घातल्याने तर  अधिक आशावाद असा सदर तक्रारदार महिला  उमेदवाराने व्यक्त केला जर सनदशीर मार्गाने न्याय मिळाला नाहीतर मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि इतर सामाजिक संघटना  यांना आंदोलन उभारण्याचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे....

प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या