🌟परभणीत भारतीय बौध्द महासभा व सुकाणू समितीच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत सामुहीक बुध्द वंदना संपन्न....!

 


🌟डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय बौध्द महासभेद्वारे आयोजन🌟    

🌟यावेळी हजारोंच्या संख्येने बौध्द उपासक व उपासिकांनी हजेरी लावली🌟        

परभणी (दि.२४ ऑक्टोंबर)  - परभणीत भारतीय बौध्द महासभा शाखा परभणी व सुकाणू समितीच्या वतीने आज मंगळवार दि.२४ ऑक्टोंबर रोजी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सामुहीक बुध्द वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने बौध्द उपासक व उपासिकांनी हजेरी लावली.

        येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ०८-०० वाजता हा वंदनेचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे व भंते उपगुप्त महाथेरो यांच्याहस्ते भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन केले. समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख तथा मेजर जनरल आनंद भेरजे यांनी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिली. पुज्य भंते डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते मुदीतानंद थेरो व भिक्कु संघ यांनी उपस्थित धम्म बांधवांना त्रिशरण पंचशील दिले.

       सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस डि. आय. खेडकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्‍वनाथ झोडपे,  व्ही. व्ही. वाघमारे, एम. एम. भरणे, के. वाय. दवंडे, सुर्यकांत साळवे, सुनिल एस. पवार, प्रेमलता साळवे, बाबासाहेब धबाले, एस. एम. कांबळे, डॉ. प्रकाश डाके, भगवानराव जगताप, पंकज खेडकर , प्रा. राजेश रणखांब, ज्ञानोबा खरात, सुनिल कोकरे, किरण झोडपे,  अरविंद पांडववीर, धम्मा वाकळे, भारत देवरे, मुकुंद खाडे, भास्कर मकरंद   यांच्यासह बौध्द उपासक, उपासिका हजारोंच्या संखेने उपस्थितीत होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या