🌟सकल मराठा समाज बांधवांनी नोंदवला भव्य कॅण्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने सहभाग🌟
परभणी (दि.२८ ऑक्टोंबर) - परभणी येथे काल शुक्रवार दि.२७ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायकाळी ०७-०० वाजेच्या सुमारास शहरातील राम नगर,कृष्ण मंदिर नवा मोढा पोलिस स्टेशन,सुपर मार्केट येथून क्रांतिकारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी परभणी शहरांमधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने भव्य कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या भव्य कॅण्डल मार्च मध्ये लहान मुले,महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाला पाठींबा म्हणून हा भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा कोटी मराठा, आरक्षण आमच्या हकाच नाही कोणाच्या बापाच....... या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता राम नगर कृष्ण मंदिर,वसंतराव नाईक पुतळा वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गी हा कॅण्डल मार्च काढण्यात आला या कॅण्डल मार्च चे आयोजन सकल मराठा समाज परभणीच्या वतीने करण्यात आले होते.....
0 टिप्पण्या