🌟या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन🌟
पुर्णा (दि.१५ ऑक्टोंबर) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने दोन दिवस ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. काळे यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे महत्त्व सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ विलास काळे पर्यवेक्षक प्रा.दत्ता पवार कर्मचारी दता कदम ज्ञानोबा मुळे यादव कल्लाळीकर ज्ञानोबा कदम आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या