🌟आर्थिक साक्षरता कुंटुंब समृध्दिचा मार्ग - गजानन सुरवसे


🌟मौजे सिमुरगव्हाण येथे आयोजित आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेत बोलतांना ते म्हणाले🌟 

पाथरी : पाथरी येथुन जवळच असलेल्या मौजे सिमुरगव्हाण येथे रिजर्व बँक आणि क्रिसिल फांऊंडेशन व रिलायस फांऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता व डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .

     या कार्यशाळेच्या माध्यमातुन ऊपस्तित महिला,पुरुषांना आर्थिक नियोजन,बचत आणि गुंतवणुक,विमा,आटलपेन्शन योजना,कर्ज, पोस्टाची सुकन्या समृध्दी योजना,पब्लिक प्रोव्हिंडन्ट फंड बँक खात्याचे प्रकार,बँकिंग लोकपाल व ईतर शासकिय योजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

  ऊवस्तितांच्या कुटुंबाच्या गरजेनुसार ऊपस्तित महिला,पुरुष यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गजानन सुरवसे कृष्णा हुलगुंडे यांची ऊपस्तीती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या