🌟यावेळी कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांविषयी खूप आत्मीयता व्यक्त केली🌟
परभणी : कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना पुष्पगुच्छ न देता परभणी जिल्ह्यातील भाजीपाला ग्रुप मधील सर्व प्रगतशील शेतकरी यांनी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ देऊन कृषी विभागामार्फत आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचा सत्कार करण्यात आला जनार्दन बालासाहेब आवरगंड राहणार माखणी तालुका पूर्णा जिल्हा परभणी, पंडित थोरात खानापूर,रामेश्वर साबळे भोगाव,प्रकाश हरकळ आर्वी, यांनी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आंबा लोणचं,आंबा सुपारी,राजगिरा पीठ, राजगिरा लाही,शुद्ध गावरान गाईचे तूप इत्यादी पदार्थ देऊन कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी परभणी,नित्यानंद काळे,कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब सातपुते,वरिष्ठ लिपिक लक्ष्मीकांत शिंदे आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी,स्वाती घोडके यांनी चव्हाण साहेबांचा सत्कार करण्यात आला साहेबांनी शेतकऱ्यांविषयी खूप आत्मीयता व्यक्त केली आणि साहेबांना खूप आनंद वाटला की आपले शेतकरी बांधव प्रक्रिया उद्योगाकडे वळत आहेत.....
0 टिप्पण्या