🌟असे प्रतिपादन बालाजी अर्बनचे अध्यक्ष ॲड मंगेश व्यवहारे यांनी केले🌟
बिना संस्कार नहीं सहकार हे ब्रिदवाक्य घेवून स्थापन झालेल्या बालाजी अर्बन संस्थेने केवळ नफा मिळविणे हे ध्येय न ठेवता सभासदांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा केलेल्या प्रयत्नांचे फलीत म्हणून नोटबंदी, कोरोना महामारी, आयकर खात्याकडुन आलेली विवीध बंधने यासारख्या प्रतिकृल परिस्थितीमध्येदेखील जवळपास १५० कोटीचा ठेवींचा पल्ला गाठला असुन संस्थेचा एकत्रीत व्यवसाय जवळपास २५० कोटी झालेला आहे. शिवाय संस्थेच्या स्वमालकीची सुसज्ज्ं व भव्य्ं वास्तुचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. संस्थेची ही घेाडदौड अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन बालाजी अर्बनचे अध्यक्ष ॲड मंगेश व्यवहारे यांनी केले. बालाजी अर्बनची ३० वी वार्षिक् सर्वसाधारण सभा परमहंस रामकृष्ण मौनिबाबा संस्थान याठिकाणी रविवार दि 17 सप्टेंबर रोजी संपन्नं झाली. यावेळी सभेच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की , दिवसेंदिवस स्थावर तारण कर्जाची जोखीम वाढत असुन सदरची कर्जे जास्तीत जास्त थकीत होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे चालु आर्थिक वर्षापासुन सुरक्षित तारण कर्ज वाटपावर भर देण्याचा संस्थेचा मानस असुन त्या अनुषंगाने संस्थेने चिखली एमआयडीसीतील दोन गोदामासह मेहकर व डोणगांव येथे संस्थेच्या सभासदांकरीता गोदाम सेवा सुरु केली आहे.आमसभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश व्यवहारे हे होते. या सभेसाठी चिखली विधानसभा मतदार संघाच्या आ. सौ. श्वेताताई महाले पाटील , यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा, कार्यकारी संचालक नारायणराव खरात, जेष्ठं संचालक तथा पतसंस्था फेडरेशन चे तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव, गोपाल शेटे, नारायण भवर, प्रताप खरात, आनंद जाधव, जुलालसिंग परिहार , श्रीमती पुष्पाताई राजपूत, सौ. संध्याताई सावजी, तज्ञ संचालक ॲड. अर्पित मिनासे, सि.ए.मनीष गुरुदासानी यांची उपस्थिती होती.
आमसभेच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून भगवान बालाजीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गित संस्थेच्या कर्मचारी प्रतिमा वाकोडे यांनी सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये संस्थेचे जेष्ठ संचालक तथा पतसंस्था फेडरेशन चे तज्ञ संचालक सुदर्शन भालेराव यांनी संस्थेच्या ३० वर्षांच्या लेखाजोखा सभासदांसमोर ठेवला.व संस्थेव्दारा सभासदांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.अहवाल तथा ठरावाचे वाचन संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लढढा, संचालक सुदर्शन भालेराव , प्रताप खरात , गोपाल शेटे , नारायण भवर , जुलालसिंग परिहार, सरव्यवस्थापक अनिल गाडे ,सहाय्यक सरव्यवस्थापक अशोक नाईक , जेष्ठ अधिकारी रमेशबापू देखमुख, शाखाधिकारी अतुल शास्त्री , राम जोशी आदिंनी केले.
याप्रसंगी चिखली शहरातील प्रथित यश व्यावसायिक मॅरेथॉन पटू सन्माननीय महेश भाऊ महाजन यांनी हैदराबाद इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरचे लक्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचा तर सौ सुवर्णा कुलकर्णी पावडे मॅडम यांना 2021 -2022 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच मागील २० वर्षांपासून संस्थेचे उत्कृष्ठं ग्राहक सभासद श्री गजानन शेळके , कैलास शेटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उत्कुष्ठ कामगिरी करणाऱ्या शाखांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये प्रथम पुरस्कार साखरखेर्डा शाखेने तर व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊळगांव शाखेने व तृतिय पुरस्कार डोणगांव शाखेने पटकावला. त्यानिमीत्ताने शाखेचे पालक संचालक व कर्मचारी वृंदाचा सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन संरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले व आभार प्रदर्शन संचालक प्रताप खरात यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक अनिल गाडे याचे मार्गदर्शनात सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. आमसभेला सभासदांचा प्रचंड प्रतिसाद लाभला
0 टिप्पण्या