🌟कै.के.एम.देशमुख व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून अमृतराज कदम हे बोलत होते🌟
पुर्णा (२६ ऑक्टोंबर) - आजच्या वर्तमानात सेंद्रिय शेती सोबतच कृषी उद्योगाची गरज असल्याचे प्रतिपादन पूर्णा तालूका शेती सेवा गटाचे सदस्य तथा गुरुबुध्दी स्वामी महाविद्यालयाचे सचिव अमृतराज कदम यांनी केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कै.के.एम.देशमुख व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते तर मंचावर सिनेट सदस्य प्रा.डॉ.विजय भोपाळे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की आजच्या काळात शेतकऱ्यांनी बाजार भाव तपासून आपल्या मालास योग्य किंमत येईल तिथेच तो विक्री केला पाहिजे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गट शेती सोबत सेंद्रिय शेती केली तर निश्चितच फायदेशीर ठरू शकते. सरकारच्या कृषी विभागातील विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजना सामान्य शेतकर्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. याप्रसंगी व्याख्यानमालेचे मार्गदर्शक डॉ. दिलीपराव देशमुख यांनी शेतीतील विविध प्रयोगाचे उदाहरणे देऊन शेतीचे महत्व पटवून दिले तर सिनेट सदस्य अशोक गुजराती यांनी मनोगत व्यक्त केले. तर व्याख्यानमालेचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले तर आभार प्रा डॉ संतोष कुऱ्हे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते......
0 टिप्पण्या