🌟असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले🌟
परभणी (दि.02 नोव्हेंबर) : जिल्ह्यात उद्योग संचालनालयाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना प्रथम व द्वितीय पारितोषिक देवून गौरविण्यात येते. प्रथम पुरस्कारासाठी 15 हजार रुपये व गौरवचिन्ह तसेच द्वितीय पुरस्कारासाठी 10 हजार रुपये व गौरवचिन्ह देवून गौरविण्यात येते. सन 2022 साठी जिल्हा पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी केले आहे.
उद्योग घटकाची एमएसएमई पोर्टलवर उद्यम आधार नोंदणी स्थायी लघु उद्योग म्हणून मागील तीन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी व उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून उत्पादनात असणे आवश्यक आहे. उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी ज्या उद्योग घटकांना राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेले नाहीत असेच उद्योग घटक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरतील. तरी वरील बाबींची पुर्तता करणाऱ्या जिल्ह्यातील पात्र लघु उद्योग घटकांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे......
*****
0 टिप्पण्या