🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम तातडीने वर्ग करा....!


🌟परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन🌟

परभणी जिल्ह्यात यावर्षी 5 लाख 20 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व इतर पिकांची पेरणी केली होती. परंतु खंड स्वरूपाच्या पावसाने पिकांच्या उत्पादनेमध्ये 50 टक्के हून अधिक घट आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी 52 महसूल मंडळातील 4 लाख 46 हजार शेतकऱ्यांना तात्काळ 25 टक्के अग्रीम देण्याचे आदेश काढले होते. परंतु अद्याप पर्यंत पिक विमा कंपनीने हे आदेश पाळले नाहीत. त्यामुळे पिक विमा कंपनीवर कारवाई करून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ अग्रीमची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर अदा करावी, अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टी परभणी महानगर च्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सरचिटणीस संजय रिझवानी, प्रशांत सांगळे, ऋतुजा ताई जोशी, सुप्रियाताई,प्रियांका ताई खडके, सौ. मुद्गलकर ताई,सौ.ठाकूर , डॉ मंजूषा नरवाडकर , रितेश जैन , मधुकर गव्हाणे , बाळासाहेब जाधव , सुप्रिया कुलकर्णी, उमेश शेळके ,डॉ.मनोज पोरवाल, रमा शेजावळे , स्वप्नील पिंगळकर, फुटाणे साहेब ,ऑड.गणेश जाधव , ऑड सोमवंशी , नितीन शुक्ल....... आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या