🌟पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे महिलांनी काढला भव्य कॅन्डल मोर्चा.....!


🌟यावेळी राजकीय व्यक्तींना गावात प्रवेश बंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ सर्वांनी घेतली🌟

पुर्णा (दि.०१ ऑक्टोंबर) - पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करते म्हणून क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माटेगाव गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी गावातून मुख्य रस्त्यातून महादेव मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत उपोषण स्थळी भव्य कॅन्डल मोर्चा काढला मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सर्व परिसर दणाणून टाकला यापुढे जोपर्यंत समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणत्याही राजकीय व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथ सर्वांनी घेतली यावेळी शाळेतील मुले मुली नवतरुण वयोवृद्ध यांची विशेष उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या