🌟 द करियर मार्गदर्शन घे भरारी या शैक्षणिक कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते म्हणाले 🌟
🌟चिखली येथे चैतन्य गुरुकुल व व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित द करियर मार्गदर्शन घे भरारी कार्यक्रम संपन्न🌟
चिखली : युवकांनो ध्येय व स्वप्न मोठे ठेवा व त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा असे आवाहन पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांनी चिखली येथे चैतन्य गुरुकुल व व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टतर्फे आयोजित द करियर मार्गदर्शन घे भरारी या शैक्षणिक कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात चैतन्य गुरुकुल येथे बोलताना केले.
अल्पावधीतच केवळ चिखली शहर व तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण व आगळ्यावेगळ्या पद्धतीने मातृभाषेतून सीबीएसई दर्जाचे अद्यावत शिक्षण देत नावारूपाला आलेली संस्था चैतन्य गुरुकुल येथे यावेळी पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश उपस्थित युवकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हटले की युवकांनो आपले ध्येय व स्वप्न मोठे ठेवा व त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. जीवनात तुम्हाला प्रकाशित व्हायचे असेल आणि पुढे यायचे असेल तर त्यासाठी मोठे ध्येय ठेवले पाहिजे व त्याकरिता अहोरात्र पाठपुरावा करण्याची व तीव्र इच्छाशक्ती बाळगणे , हिंमत न हरता न घाबरता सतत अहोरात्र प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच तुम्हीजीवनात यशस्वी होऊ शकता व स्वतःचे अस्तित्व जगाला दाखवून देऊ शकता प्रत्येकाने आपल्यामध्ये असलेल्या गुणांचा व क्षमतेचा शोध घेऊन त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे कुठल्याही क्षेत्रात काम करा पण त्यामध्ये आपले स्थान अव्वल ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न करा भविष्यात तरुणांच्या कार्य कौशल्या व गुणांमुळेच भारत महाशक्ती म्हणून निश्चितच उदयास येणार आहे असल्याचे मत या वेळी व्यक्त केले .
चिखली येथील चैतन्य गुरुकुल आणि व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने आयोजीत 'द करीयर’ या कार्यक्रमाला पोलिस महासंचालक कृष्णप्रकाशजींच्या विद्यार्थी, युवक वर्गाकडून, नागरिकांचा अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट आणि चैतन्य गुरुकुल चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने 2022-23 मध्ये इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रोत्साहन मिळावे आणि लॉकडाऊनच्या काळात झालेले शैक्षणीक नुकसान यात सुधारणाकरण्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणुन घे भरारी नावाने टेस्ट सिरीज घेण्यात आली होती. चिखली परीसरातील एकुण 45 शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. तसेच चैतन्य गुरुकुल मध्ये शिकुन वर्ग 12 वी पास झालेले अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी NIT, NDA, Government मेडीकल कॉलेज तसेच गव्हर्नमेंट अशा नामकित संस्थामध्ये प्रवेश मिळवू शकले आहेत. सोबतच क्रिडा क्षेत्रात सुध्दा चैतन्य गुरुकुलचे विद्यार्थी विभागस्तर आणि राज्यस्तरावर निवड होण्यास पात्र ठरले होते. अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्याच्या बक्षिस वितरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (फोर्स वन ) कृष्णप्रकाशजी चैतन्य गुरुकुल शाळेमध्ये चिखली येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून कार्यरत असणारे मा.विदयाधरजी महाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व्यास हे होते.
या कार्यक्रमाला जिल्हयाभरातुन हजारो विद्यार्थी, युवक सर्व क्षेत्रातील गणमान्य, प्रतिष्ठीत मान्यवरांच्यासह हजारो नागरिक उपस्थिती होते. मा. पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश आणि मा. विदयाधरजी महाले यांना चैतन्य गुरुकुल व व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट च्या वतीने चैतन्य गुरुकुलचे संचालक आशुतोष चौधरी आणि व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व्यास यांच्या हस्ते ‘कर्तव्य श्री’ हा किताब बहाल करुन सन्मानित करण्यात आले ,यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
2004 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदी असतांना गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळख निर्माण केली व बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनात अनेक बदल घडून गुन्हेगारीला आला बसवून पोलीस प्रशासन का असते आणि काय करु शकते याचा परिचय आपल्या कार्याने संपूर्ण जिल्हयाला करुन देणारे कृष्ण प्रकाश जे सध्या राज्याचे अप्पर पोलीस अधिक्षक आहेत त्यांचे प्रत्येक शब्द तरुणाईसाठी उर्जा देण्याचे काम करतो. याप्रसंगी तरुण आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी युवाशक्तीला समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा आपले ध्येय सुनिश्चित करुन त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी ठेवावी. अडचणीवर मात करित कठीण परिस्थितीतही न डगमगता मार्ग काढायला हवा आणि आपले ध्येय गाठायला हवे. असे मोलाचे मार्गदर्शन आपल्या अमोघ अशा वक्तृत्वातुन दिले.
यावेळी प्रस्थाविक करतांना चैतन्य गुरुकुलचे संचालक आशुतोष चौधरी यांनी विद्यार्थी हितावर आधारीत उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांना अकॅडमीक सोबतच इतर सर्व क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून चैतन्य गुरुकुल सदैव प्रयत्नात राहील असे मत व्यक्त केले .यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व्यास यांनी आतापर्यंत 100 कॅम्प घेत गोरगरीबांना वैद्यकिय सेवेचा लाभ दिला असल्याचे सांगितले जिल्हाभरातील दुर्धर रोगांवर व्यास कॅन्सर ट्रस्टच्या माध्यमातुन निशुल्क उपचार करण्यात आले आणि अनेक सामाजीक उपक्रम हे निस्वार्थ भावनेतुन राबविण्यात आले असून समाजसेवा हिच ईश्वरसेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
चैतन्य गुरुकुल तसेच व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्ट या दोन्ही संस्थानी एक अनोखा उपक्रम राबवित होतकरु युवक व विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन घडवून आणलेल्या या व्याख्यानामुळे नक्कीच असंख्य विद्यार्थी, युवक आपल्या क्षेत्रात नव्या दमाने कामाला लागतील अशी उपस्थित नागरिकासह चिखली तालुक्यात व संपूर्ण बुलढाणां जिल्ह्यांमध्ये मध्ये चर्चा होती....
✍️ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या