🌟मराठा समाजाच्या मागणीला सरकार चालढकल करत असल्याने समीर दुधगांवकरांनी दिला भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा...!


🌟राज्य सरकार मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत नसल्याचा केला आरोप🌟 

राज्यामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी तीव्र आंदोलन चालू आहे. या आंदोलनाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील भाजपाचे नेतृत्व बरोबर देत नाही, मोदींनी जसे निर्णय घ्यायला सांगितले तसे पण भाजपा महाराष्ट्र अनेकदा वागत नाहीत. 

राज्य सरकार मराठा समाजाच्या भावना लक्षात घेत नाही. तरुण मुलं आत्महत्या करत आहेत. ही गंभीर बाब आहे. अशा परिस्थितीत मी समाजासोबत उभे राहण्याचा निर्णय रविवारी घेतला व भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सोमवारी पक्षाकडे पाठवुन दिला असल्याचे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे माजी मराठवाडा संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष समीर गणेशराव दुधगावकर यांनी म्हटले आहे......

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या