🌟बीड जिल्हा बंजारा समाज यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पप्पू चव्हाण यांचा करण्यात आला सत्कार🌟
बीड (प्रतिनिधी) :- माजी मंत्री पंकजाताईं मुंडे व खा. डॉ. प्रिंतमताई मुंडे यांचे विश्वासू परळी तालुक्यातील कौठळी येथील बाळासाहेब उर्फ पप्पू चव्हाण यांची वसंतराव नाईक तांडा सुधार समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे. वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पप्पू चव्हाण यांनी पदभार स्वीकारला व कामकाज बाबत माहिती समजून घेतली. तसेच समाजकल्याण सहाय्यक आयुक्त श्री शिंदे यांनी पदभार देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान बीड जिल्हा बंजारा समाज यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान,माजी मंत्री पंकजाताईं मुंडे व खा. डॉ. प्रिंतमताई मुंडे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून जबाबदारी दिली तो विश्वास जन सामान्यांची कामे करून सार्थ करून दाखवू असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या अंतर्गत हाती घ्यावयाची कामे जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखालील समितीस सुचविण्याकरिता बंजारा बहुल जिल्ह्यासाठी स्थापन करावयाच्या समितीच्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील कौठळीचे भाजपाचे युवा कार्यकर्ते बाळासाहेब भाऊराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे आदेश शासनाच्या वतीने निर्गमित करण्यात आले. बीड जिल्हा समाज कल्याण कार्यालय येथे वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पप्पू चव्हाण यांनी स्वीकारला पदभार घेतला तसेच कामकाज समजून घेतले.त्यांचा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिंदे साहेब यांनी पदभार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यानी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रतिमताई मुंडे यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली. जो विश्वास टाकून जबाबदारी दिली तो विश्वास जन सामान्यांची कामे करून सार्थ करून दाखवू असे चव्हाण यांनी म्हटले आहे. पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रतिमताई मुंडे यांचा विश्वास सार्थ करून दाखवू असे ते म्हणाले. हे पद माझ्यासाठी खुप महत्वाचे आहे. पदाला न्याय देण्यासाठी मी वचनबद्ध आहे.
दरम्यान महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक तांडा सुधार व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब (पप्पु) चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. बंजारा समाजातील युवा कार्यकर्त्यांला बंजारा समाजातील सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल अतिशय नम्र, जिद्द ,चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर वरिष्ठांचा शब्द हा प्रमाण म्हणून काम करणार एक सर्वसामान्य कार्यकर्ता, वरिष्ठांच्या विश्वासास् पात्र ठरला असून या भविष्यात यशाबद्दल मिळालेल्या पदाचा भविष्यात त्याच्या हातून बंजारा समाजाची कायम चांगली सेवा घडो. यासाठी सकल बंजारा समाज बीड यांच्यावतीने बाळासाहेब (पप्पु) चव्हाण यांचा बीड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सोमवारी (ता.२०) भव्य सत्कार सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यास बीड जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील युवा, तरुण, युवा कार्यकर्ते , ज्येष्ठ नागरिक ,महिला भगिनी, अधिकारी, कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.....
0 टिप्पण्या