🌟मानवत ते परभणी या निकृष्ट दर्जाच्या रस्त्या संदर्भात माजी खासदार सुरेश जाधव यांनी केली तक्रार....!


🌟राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मा.खा.जाधव यांनी केली तक्रार🌟 

परभणी (दि.02 नोव्हेंबर) : परभणी जिल्ह्यातील 'मानवत रोड ते परभणी' या राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या निकृष्ट कामाबाबत माजी खासदार तथा शिवसेना परभणी जिल्हा संपर्क प्रमुख अ‍ॅड.सुरेश जाधव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. असून त्यांनी निवेदनाद्वारे या रस्ते कामातील अंदाधुंदपणाबाबत गांभीर्याने चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

             या रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदार, देखरेख करणारे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या संगणमताने दर्जाहीन झालेले आहे. न टिकणारा रस्ता तयार झालेला आहे. त्याचा परिणाम शासनास कोट्यवधी रुपयांचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या रस्ते कामाबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करावी व संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी अपेक्षा माजी खासदार जाधव यांनी व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या