🌟पुर्णेतील पंचशिल नगर या ठिकाणी ग्रंथ वाचन व वर्षावास समारोप कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना ते म्हणाले🌟
पुर्णा (दि.03 नोव्हेंबर) - पुर्णेतील पंचशिल नगर या ठिकाणी ग्रंथ वाचन व वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्कु संघ भदंत पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा तालुका व जिल्हा शाखा आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे प्रमुख पाहुणे नगरसेवक विरेश कसबे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदंड श्रीकांत हिवाळे ज्ञानोबा जोंधळे बाबाराव वाघमारे डॉ.तूपसमंदर भोजराज कसबे त्र्यंबक कांबळे अतुल गवळी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथ वाचक बौद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे यांनी केले बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्या आचरणाचा भाग बनला पाहिजे असे त्यांनी सांगितले.भदंत पय्यावांश यांनी अंधश्रद्धा जुनाट रूढी परंपरा कर्मकांड या पासून दूर राहून बुद्धधम्म तत्व प्रणाली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मानव मुक्तीचे विचार समजाऊन घेतले पाहिजे.श्यामराव जोगदंड यांनी भारतीय बौद्ध महासभेचे वैभवशाली इतिहास व आंबेडकरी घराण्याचा त्याग विशद केला.
श्रीकांत हिवाळे यांनी बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मविष यक विचार माता रमाई यांचे स्वप्न नागपूर येथील दीक्षा भूमी च्या रूपाने कसे साकारले या विषयी सविस्तर सांगितले त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा चे पालन करण्या मध्येच आपले हित आहे अध्यक्षीय समारोपात एम.यु खंदारे यांनी पूर्णा शहराचा आंबेडकरी व धम्म चळवळीचा रोमहर्षक इतिहास कथन केला.धम्म विचार गतिमान करण्या साठी महिला मंडळाचे मोठे योगदान आहे असे या प्रसंगी ते म्हणाले.
आम्रपाली महिला मंडळ यांच्या वतीने ग्रंथ वाचक उमेश बाऱ्हाटे यांचा सपत्नीक शुभ्र वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना खीर दान करण्यात आले.या कार्यक्रमास पूर्णा शहरातील धम्म सेवेत कार्यरत असलेल आम्रपाली महिला मंडळाच्या आशाबाई कसबे नीलाबई खिल्लारे शांताबाई डेंगळे बेबी बाई कांबळे द्रोपदा बाई आहिरे शकुंतला बाई कुचेकर शांताबाई बारहटे राखी बाई लोंढे शांताबाई गायकवाड शीलाबाई हटकर यांनी परिश्रम घेतले.
पुर्णा शहरातील धम्म सेवेत कार्यरत असलेली महिला मंडळे यांची उपस्थिती होती......
0 टिप्पण्या