🌟मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी लढावे लागेल - भाजप जिल्हा उपाध्यक्ष : ऋषिकेश सकनुर


🌟मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती थांबवयाची असेल तर आपण सगळ्यांनी एकजूटिने समानन्यायी पाणी वाटप बाबत जागृत झाले🌟


पाणी जीवन आहे आणि ही लढाई मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना संदर्भात म्हणजेच जीवन मरणाची आहे. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढाई आता नेटाने लढावी लागणार आहे. नगर, नाशिक, चे पुढारी आणि कारखानदार 'गोदावरी पाटबंधारे प्रकल्पाच्या समान पाणी वाटपात' कायम कुरघोडी करून दादागिरी दाखवतात. ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, यासाठी मराठवाड्यातील जनतेनी आता लढा सुरू केला आहे. हा लढा अधिक तीव्र करून आपणास आपल्या वाट्याचे पाणी मिळवावे लागणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती थांबवयाची असेल तर आपण सगळ्यांनी एक जुटिने समानन्यायी पाणी वाटप बाबत जागृत झाले पाहिजे व जनतेत जागृती केली पाहिजे.


आज वार. शुक्रवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर येथे. मराठवाडा पाणी परिषद आयोजित. निदर्शन आंदोलनात परभणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर हे बोलत होते.यावेळी परभणी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके. भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष आंबड, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोचरे,किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उध्दव नाईक, विकास मगर, स्वराज घुबरे ,

भीमाशंकर शिराळे, शिवकुमार शिराळे, पांडुरंग नखाते, यांच्या सह शेतकरी, राजकीय पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


*प्रमुख मागण्या *

१) समानन्यायी पाणी वाटप नियमानुसार त्वरित जायवाडीमध्ये पाणी सोडावे.

२) आंतरखोरे पाणी वहन अंतर्गत १६८ टीमसी पाणी गोदावरी नदीत वळवावे.

३) कृष्णा=मराठवाडा योजनेच्या कामास गती द्यावी

४) विदर्भातील वैनगंगा, प्राणहिता नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी इलदरी धरणात वळवावे,

५) मराठवाड्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करावे.

६) दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करावा.

     यासह अनेक मागण्यासाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ. छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी संचालक यांच्या कडे मागण्याचे निवेदन देऊन. तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या