🌟त्यांनी धम्म कार्यात स्वातःला वाहून घेतले होते🌟
पुर्णा : पुर्णा शहरातील डॉ.आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ धम्म उपासक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी गंगाधर लक्ष्मण खरे यांचे वयाच्या 84 वर्षी शुक्रवार दि.10 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 05-00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
आंबेडकरी व धम्म चळवळीची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेल्या कुटुंबातून ते आले होते.वडील लक्ष्मणराव व आई टिकाबाई यांनी 1950 च्या दशका मध्ये आपल्या सर्व मुलामुलींना उच्च शिक्षित करून चरित्र नीतिमत्ता सदाचाराचे धडे दिले होते महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणून खेडे सोडून ते पूर्णा शहरात आले उच्च शिक्षण घेतले रेल्वे खात्यामध्ये ते नोकरीस लागले.आपल्या ओळखीने अनेकांना त्यांनी रेल्वे मध्ये नोकरीस लावले.
आई टीका बाई खरे यांना धम्म कार्याची आवड होती प्रबोधन दृष्टीचे आदर्श निर्वाण स्थ पूज्य भंते उपाली थेरो व अखिल भारतीय भिक्कु संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे श्रद्धा संपन्न उपासक उपसिका म्हणून ते सुपरिचित होते.टीका बाई खरे ह्या 1975 मध्ये भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या उप संपदेला कुशिनगर या ठीकानी गेल्या होत्या. पूर्णा शहरातून इतरही उपासक उपसिका गेले होते.गंगाधर खरे यांनी कर्तव्य दक्ष पणे रेल्वेची नोकरी केली.फावल्या वेळेत त्यांनी धम्म कार्याला वाहून घेतले होते.विहारात संपन्न होणारे कार्यक्रम धम्म परिषद या मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा......
0 टिप्पण्या