🌟जनहीताशी बांधिलकी जोपासणाऱ्या पत्रकारांचा अवमान अन् बाजार बसव्यांना सन्मान ? बेईमानशाही बेभान🌟
दिपावली आली की समाजातील प्रत्येक वर्ग दिपावलीचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने कामाला लागतो परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत प्रत्येकाच्या न्याय-हक्कासाठी सदैव तत्पर राहून आपल्या हातातील लेखणीच्या माध्यमातून सातत्याने संघर्षरत राहणारा व प्रत्येकाला आपल्या अडचणींच्या वेळी किंवा प्रसिध्दीवेळी आवर्जून आठवणारा समाज व्यवस्थेचा अविभाज्य अंग अर्थात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला संबोधित केले जाते तो ग्रामीण भागातील बिन पगारी फुल्ल अधिकारी ? जाहिरातींच्या बदल्यात मिळणाऱ्या पंधरा/विस टक्क्यांसाठी रात्रंदिवस वेठबिगारी अशी अवस्था झाल्यागत प्रत्येकासमोर केविलवाणेपणान हात पसरत 'मला जाहिरात देता कारें कुणी जाहिरात देता का ? असे म्हणत वृत्तपत्र व्यवस्थापणाकडून ठरवून दिलेले जाहीरातींचे टारगेट पुर्ण करण्यात मागील दिपावली ते पुढील दिपावली या वर्षभर ज्यांना ज्यांना प्रसिध्दी दिली त्या प्रसिध्दीच्या झोतात वावरणाऱ्यांकडून मान अपमान सहन करत करत जाहिराती गोळा करण्यात गुंग होतो अन् केव्हा दिपावलीचा सन निघून जातो हे सुद्धा त्या बिचाऱ्या पत्रकारांच्या लक्षात येत नाही यानंतर देखील ज्या काही जाहिराती उधारपाधार मिळवण्यात त्या बिचाऱ्याला यश मिळते त्यातील काही लंपटचोर जाहिरातदार पायातील पादत्राणे फाटोस्तर जाहीरातींची बिल अदा करीत नाहीत काही निर्लज्ज सम्राट तर असेही असतात जे पत्रकारांना जाहीरातींची आशा दाखवून कसे अपमानीत केले याचा आनंद दिपावलीच्या आनंदासह जल्लोषात साजरा करतात दिपावली ते दिपावली सतत वर्षभर संपर्कात राहून प्रसिध्दीच्या झोतात वावरणारे देखील दिपावलीची चाहूल लागताच काही ताटाखालची मांजर वगळता इतर पत्रकारांना संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे आढळून येतात.
* वृत्तपत्रांसह जाहिरातींची बिल बुडवण हा देखील सुडाचाच एक भाग :
जनहीताशी बांधिलकी जोपासत असत्याच्या विरोधात निर्भिडपणे लिखाण करणं म्हणजे स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्याची जाणीवपूर्वक राखरांगोळी करुन घेण्यासारखेच म्हणावे लागेल कारण या क्षेत्रात निस्वार्थपणे जनहीताशी बांधिलकी जोपासत पत्रकारीता करीत असतांना निष्कारण अनेकांशी वैर पत्करावा लागतो मग वैऱ्यांमध्ये तत्वभ्रष्ट राजकीय पक्ष पदाधिकारी/लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी नौकरशहा माफिया/तस्करांचा देखील समावेश असू शकतो मागील तिन दशकांपूर्वी वृत्तपत्र क्षेत्रात अशी एक म्हण प्रचलित होती की एखाद्याला खऱ्या अर्थाने उभ्या आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला पत्रकार क्षेत्रात आणायचे आणि एखाद्या वर्तमानपत्रात प्रतिनिधी म्हणून त्याची नेमणूक करायची मग काय त्याच्या नाकात शिरलेले निर्भिड पत्रकरीतेचे वारेच एक दिवस चक्रीवादळाचे रुप धारण करून त्याच्या आयुष्याची संपूर्णपणे वाट लावण्यास कारणीभूत ठरणार नाही तर नवलच ? जनहीताशी बांधिलकी जोपासत निर्भिडपणे वास्तववादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करणे त्यांची अमानुषपणे हत्या करणे तसेच त्यांच्यावर भ्रष्ट नौकरशहांची नितीमत्ता गांधीछाप कागदात गुंडाळून खोटे अर्थात बनावट गुन्हें दाखल करणे हा जसा सुडाचा भाग असला तरी याहीपेक्षा भयंकर सुडाचा भाग म्हणजे तो पत्रकार ज्या वर्तमान पत्रात कार्यरत असतो त्या वर्तमान पत्राच्या संपादक संचालक तसेच व्यवस्थापणाच्या नजरेत त्याला पाडण्याच्या दृष्टीने प्रथमतः त्याला जाहिरात तर द्यायची परंतु जाणीवपूर्वक त्या जाहिरातीचे बिल देण्यास टाळाटाळ करीत ते शेवटी बुडवायचे हा देखील सुडाचाच एक भाग म्हणावा लागेल याला म्हणतात पत्रकाराला दिलेला 'स्लोपॉयझन डोस' सुड तर उगवायचा परंतु संबंध देखील कायम ठेवायचे मग हा देखील सुडाचाच एक भाग नव्हें काय ? दिपावली किंवा विशेष अंकासाठी मिळालेल्या जाहिरातींची अर्धी बिल जरी बुडव्यांनी बुडवली तरी त्या बिचाऱ्या पत्रकाराला स्वतःचे १५/२० टक्के कमिशन वगळून उर्वरित थकबाकी मात्र स्वतःच्या खिशातूनच भरावी लागते.
अरें बाबांनो सोपी नसती निर्भिड व जनहीवादी पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत असतांना ज्या वृत्तपत्रात आम्ही कार्यरत आहोत त्या वृत्तपत्राच ऋण म्हणून राबराब राबून त्या वृत्तपत्राच हित जोपासत प्रत्येक वर्षी अक्षरशः सनवार विसरुन जाहीरातींसाठी मान अपमान सहन करीत जाहीराती तर मिळवाव्याच लागतात बातम्यांचा मागोवा घेत शत्रूंच्या संख्येत वाढ करुन जनहीताशी समाजाच्या अन्नदाता शेतकऱ्यांच्या हिताशी बांधिलकी जोपासत अमानुष मानसिक शारीरिक अंत्याचार सहन करीत हल्ल्यांसह भ्रष्ट नौकरशहा तत्वभ्रष्ट राजकीय दहशतवादी समाजकंटक माफियांच्या बनावट गुन्ह्यंसह छळ/कपट/अपमानास्पद वागणूकीला देखील सामोरं जावं लागतं समाजातील सर्वसामान्य घटकांना जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही तेव्हा त्यांची पाऊलं आपोआपच एखाद्या जनहीवादी निर्भिड पत्रकाराच्या घराच्या दिशेने वळतात अरें हिच तर असते त्या लेखणीची खरी ताकत आणि विश्वासार्हता....उगाच एखाद्या भामट्याने उठायचे आणि आपल्या दुष्कृत्यावर पांघरूण टाकण्याच्या दृष्ट हेतूने पित्त पत्रकारीतेचा आधार घेऊन भ्रष्ट बेईमान नौकरशहा भ्रष्टाचारी राजकारणी माफिया तस्करांच्या हातातील कळसुत्री बाहूल बनून या क्षेत्राला कलंकित करण्याचा निच उद्योग चालवायचा आणि भ्रष्ट बेईमानशाहीच्या पाळीव कुत्र्यागत मुखबीरी करत सर्वत्र भुंकत फिरायचे याला पत्रकारीता म्हणायची काय ? प्रशासकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात व्यापार क्षेत्रातील तत्वभ्रष्ट लोकांकडून देखील अश्या भामट्यांना प्रथमतः प्राधान्य मिळत असल्यामुळे अशा भामट्यांची संख्या या क्षेत्रात जोमाने वाढतांना पाहावयास मिळत आहे....
✍🏻 परखड सत्य : चौधरी दिनेश (रणजित) पुर्णा
0 टिप्पण्या