🌟पात्र उमेदवारांनी दि.०८ नोव्हेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे🌟
परभणी (दि.०१ नोव्हेंबर) : भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर भरती होण्याची सुवर्णसंधी असून, त्यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी बुधवार, दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी सैनिक कल्याण विभाग, पुणे (डीएसडब्ल्यू) यांच्या संकेतस्थळावर सर्च करून त्यातील एसएसबी - ५५ कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची माहिती भरून सोबत आणावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.
भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी २० ते २९ नोव्हेंबर दरम्यान (कोर्स क्र. ५५) छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास आणि भोजन दिले जाते. त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षार्थींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती ढालकरी यांनी केले आहे.
या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन किंवा नॅशनल डिफेंन्स अॅकेडमी एक्झामिनेशन पास केलेली असावी व त्यासाठी सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी तो पात्र झालेला असावा. एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास असावा व एनसीसी ग्रूप हेडर्क्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉललेटर असावे आणि एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com किंवा ०२५३-२४५१०३२ आणि ९१५६०७३३०६ या व्हॉटस ॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.......
*****
0 टिप्पण्या