परभणी (दि.०२ नोव्हेंबर) : क्रांतिकारी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने परभणी जिल्ह्यात गावागावात सुरु करण्यात आलेल्या साखळी उपोषणासह बेमुदत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यां पैकी काहीं उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाजासह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यात जवळपास ३२२ ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत तर अनेक समाज बांधव हे विविध ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणास अर्थात अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. त्यापैकी जिंतूर येथील चौघा उपोषणार्थींपैकी एकाची तक्ष पुर्णा तालुक्यातील गौर येथील एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली असून जिंतूर येथील उपोषणकर्त्याला जिंतूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पुर्णा तालुक्यातील गौर येथील उपोषणकर्त्याला उपोषणस्थळावरच औषधोपचार करण्यात येत आहेत तर पाथरी तालुक्यातील पिंपळगाव फाटा,देवनांद्रा व पाथरी शहरातील साखळी व बेमुदत उपोषणात सहभागी उपोषणकर्त्यांपैकी काहींची प्रकृती खालावल्याने तेथील आरोग्य केंद्रांमधून उपोषणकर्त्यांना दाखल करण्यात आले आहे.
पुर्णा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर देखील पाच मराठा समाज बांधव आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या प्रकृतीची देखील प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे दरम्यान, सकल मराठा समाज बांधवांनी या उपोषणकर्त्यांची प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घ्यावी,असे आवाहन केले आहे......
0 टिप्पण्या