🌟दयावान सरकार महिला अध्यक्षा प्रियाताई वैद्य यांचा वाढदिवस परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप करून साजरा...!

 


🌟या सामाजिक उपक्रमाचे आयोजन समाजहित अभियान प्रतिष्ठान कडून करण्यात आले होते🌟

परभणी : संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या निःस्वार्थ कार्याने परिचित असलेली तसेच गोर गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी सदव्य तत्पर असणारी सामाजिक संघटना दयावान सरकार महाराष्ट्र राज्य च्या महिला अध्यक्षा मा. प्रियाताई वैद्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्यकारणी व समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी च्या वतीने परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्या आयोजनातून जनसेवक रमेश घनघाव यांच्या साहाय्याने  गोर गरीब गरजू निराधारांच्या हक्कासाठी सतत कार्यशील असणाऱ्या दयावान सरकार महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा युवा नेतृत्व प्रिया ताई वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 

हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी संदीप भाई निकुंभ संस्थापक अध्यक्ष, सिद्धार्थ भाई राक्षे महाराष्ट्र अध्यक्ष, संजय भाई गायकवाड मराठवाडा अध्यक्ष, रघुवीर सिंग भाई टाक जिल्हाध्यक्ष परभणी, ॲड. सुभाष अंभोरे जिल्हा कार्याध्यक्ष डोंबिवली आदींचे मार्गदर्शन लाभले. या सामाजिक उपक्रमाचे आयोजन समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी केले. या वेळी समाजहित अभियान प्रतिष्ठानचे सचिव जनसेवक रमेश घनघाव, रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, प्रशांत वाटुरे, समाजहित अभियान प्रतिष्ठान राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, भीमा कोरेगाव मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष संदीप वायवळ, हरदिप सिंग बावरी, महिला पदाधीकारी दयावान सरकार परभणी कांताबाई कानडे आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या