🌟सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कॅंडल मार्चमध्ये माता-भगिनींसह अबालवृद्धांनीही नोंदवला सहभाग🌟
पुर्णा (दि.०१ नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील मौ.फुकटगाव येथे मराठा आरक्षण व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने काल मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर २०२३ रोजी भव्य कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते तत्पुर्वी दि.३० ऑक्टोंबर २०२३ रोजी फुकटगाव ग्रामपंचायतीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत फुकटगावात राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा ठराव सरपंच सौ.कांचन अशोक बोकारे यांनी मांडला त्या ठरावाला सुचक म्हणून तानाजी बोकारे तर अनुमोदक म्हणून सौ.वेनुबाई भगवान बोकारे यांनी समर्थन दिले.
दरम्यान फुकटगाव येथे का मंगळवारी रात्री सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षण व मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या कॅंडल मार्च मध्ये माता-भगिनींसह अबालवृद्धांनी तसेच तरुण तरुणींनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी एक मराठा लाख मराठा.....आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे....मनोज जरांगे पाटील आगे बढों हम तुम्हारे साथ हैं....अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परीसर दणाणला होता....
0 टिप्पण्या