🌟मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनास पीयुसी असणे बंधकारक🌟
परभणी : जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारक चालकांनी वाहनाची पीयुसी काढून घ्यावी. शुक्रवार (दि.10) पासून परभणी जिल्ह्यातील सर्व वाहनांची पीयुसी तपासणीची कडक मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच आपापल्या वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावीत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनास पीयुसी असणे बंधकारक असून, तसेच ती वैध नसल्यास तात्काळ काढून घेण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
0 टिप्पण्या