🌟गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिली उपोषणाला सदिच्छा भेट🌟
गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाला सदिच्छा भेट दिली उपोषणकर्त्यांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या मागण्या सविस्तरपणे समजून घेतल्या महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी संघटना सलग्न अधिकारी, कर्मचारी व कामगार यांनी काही प्रमुख मागण्यांसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
जीएसटी अनुदान वाढवून मिळणे, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १००% अनुदान मिळणे, जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळणे, या तीन प्रमुख मागण्यांसाठी संस्थापक अध्यक्ष के.के.आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात अध्यक्ष नजाम खॉंन, सचिव विकास रत्नपारखे, कोषाध्यक्ष खॉंजा मोईन खॉंन यांच्यासह परभणी लातूरचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.....
0 टिप्पण्या