🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी बुधवारी जागेवर निवड संधी.....!


🌟जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा - सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे

परभणी (दि.03 नोव्हेंबर) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय तंत्र प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योजक, तंत्र प्रशाला नारायण चाळ येथे बुधवारी दि.08 नोव्हेंबर रोजी जागेवर निवडसंधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत एसएस इन्फोटेक व एएम टेक्नॉलॉजिज या कंपनीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आणि मार्केटींग एक्झिीक्युटीव्ह पदाकरिता भरती करण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.    

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे..... 

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या