🌟सोनपेठ-नांदेड बसला प्रवास्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा - सरदार सतप्रीतसिंग शाहू

🌟शाहू यांनी परभणी विभागीय नियंत्रण व गंगाखेड आगार प्रमुखांशी सतत संपर्क साधून सोनपेठ नांदेड बस सेवा सुरु केली🌟

सोनपेठ (दर्शन) :- सोनपेठ शहरातील शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतप्रीतसिंग शाहू यांच्या प्रयत्नातून दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी सोनपेठ नांदेड बस सेवा गंगाखेड आगारातून सुरू करण्यात आलेली आहे, सतप्रीतसिंग शाहू यांनी परभणी विभागीय नियंत्रण तसेच गंगाखेड आगार प्रमुख यांच्याशी सतत संपर्कात राहून सोनपेठ नांदेड बस सेवा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पाठपुरावा केलेला आहे, यांच्या पाठपुराव्याला दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुर्त स्वरूप येऊन अखेर गंगाखेड आगाराची सोनपेठ नांदेड बस सेवा सुरू करण्यात आली सोनपेठ येथून ही बस दुपारी 3.30 वाजता निघून गंगाखेड पालम लोहा मार्गे नांदेड मुक्कामी तर सकाळी 7 वाजता नांदेड येथून परत लोहा पालम गंगाखेड मार्गे सोनपेठ चालणार आहे.


तरी प्रवासी बांधवांनी या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त फायदा घेतल्यास या बस सेवेच्या फेऱ्या वाढवण्यात येतील व आपणासाठी सकाळ दुपार व संध्याकाळ अशा तीन फेऱ्या सुरू करण्यात येतील अशी ग्वाही परभणी विभागीय नियंत्रण तसेच गंगाखेड आगार प्रमुख यांनी दिलेली आहे तरी प्रवासी बांधवांना शहीद भगतसिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सतप्रीतसिंग शाहू यांनी आवाहन केलेले आहे की नांदेड सोनपेठ बस सेवेला प्रतिसाद द्यावा....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या