🌟राज्य शासनाने तब्बल २७१.८८ कोटी रूपये किंमतीस दिली मान्यता🌟
पुर्णा : गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पूर्णा तालुक्यातील ममदापुर उच्च पातळी बंधारा बांधकाम करणे करीता राज्य शासनाने तब्बल २७१.८८ कोटी रूपये किंमतीस मान्यता दिली आहे. त्यामुळे जवळपास १३७५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा भरघोस फायदा होईल.
तसेच बळीराजाला चांगलाच दिलासा मिळणार आहे. सदर प्रकल्पांतर्गत ९.१० दलघमी पाणीसाठा होईल. त्यामुळे परिसरातील अनेक गावांना समृद्धी प्राप्त होईल. मंजूर खर्चातून भूसंपादन, बांधकाम, पूल, इमारत, देखभाल, दळणवळण व इतर काही बाबी मार्गी लागतील. ममदापूर बंधारा निर्मितीमुळे त्या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यातून शेतीला पर्यायाने परिसरातील गावांना सुगीचे दिवस येतील. राज्य शासनाने सकारात्मक विचार करून अंतिम मंजुरी दिली. त्याबद्दल सरकारचे मन:पूर्वक आभार!
0 टिप्पण्या