🌟केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले🌟
परभणी (दि.02 नोव्हेंबर) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये आंबिया बहार 2023-24 साठी केळी पिकामध्ये विमा योजने सहभागी होण्यासाठी 31 ऑक्टोबर 2023 मुदत होती. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत विहित वेळेत सहभागी होऊ शकले नाहीत. अशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार, दि. 03 नोव्हेंबर 2023 ही केंद्र शासनाने मुदतवाढ दिली आहे. तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.
*****
0 टिप्पण्या