🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुलची रिक्त शिक्षकसंख्या भरा अन्यथा अर्धनग्न आंदोलन....!


🌟पालकांचा लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाला इशारा🌟

फुलचंद भगत

वाशिम :- जिथे ३७ शिक्षक आवश्यक त्या मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद हायस्कुलला केवळ १६ शिक्षक कार्यान्वित असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे.ही रिक्त शिक्षक संख्या त्वरीत भरुन होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळावे अन्यथा मंगरुळपीर पं.स.कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी लेखी निवेदनाव्दारे सबंधित विभागांना दिला आहे.


        एकीकडे विद्यार्थ्याअभावी बंद पडत असलेल्या जि.प.शाळा वाचविन्यासाठी पालकासोबतच प्रशासनाचीही धडपड आहे.दर्जेदार शिक्षण आणी त्यासोबतच विद्यार्थ्यांना भौतिक सुविधाही ऊपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न असलेले दिसते परंतु मंगरुळपीर येथील जि.प.हायस्कुल व जि.प.ज्युनीअर काॅलेजची अवस्था ही वेगळी आहे.तिथे विद्यार्थ्या आहेत माञ अपुर्‍या शिक्षकसंख्येअभावी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत आहे.या शाळेवर आवश्यक तेवढा शिक्षकभरणा करुन विद्यांर्थ्यांना शिक्षण ऊपलब्ध करुन द्यावे यासाठी आधीही प्रशासनाकडे पालकांकडुन निवेदने,आंदोलने करण्यात आली परंतु  तरीही आवश्यक तेवढे शिक्षक शाळेवर कार्यरत नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणीक गैरसोय होत असल्याचे बघुन पालकांनी आता आक्रमक भुमिका घेतली आहे.जिथे ३७ शिक्षकसंख्या आवश्यक असतांना केवळ १६ शिक्षकाच्या खांद्यावर विद्यार्थ्यांची शैक्षमीक धुरा असल्याने होणारे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी एकञ येवुन प्रशासनाला आपल्या मागण्याचे लेखी निवेदन दिले.जर रिक्त शिक्षकसंख्या न भरल्यास दि.२० डिसेंबर पासुन येथील पंचायत समिती कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदनाव्दारे दिला असुन सदर निवेदनाच्या प्रति सबंधित प्रशासनालाही पाठवण्यात आल्या आहेत.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या