🌟स्विस अकॅडमीच्या वतीने २६ जानेवारी रोजी सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आराध्य चौधरीचा सत्कार🌟
परभणी : वाशिम येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत परभणी येथील स्विस अकॅडमीचा विद्यार्थी आराध्य उमेश चौधरी याने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शुक्रवार २६ जानेवारी रोजी स्विक अकॅडमी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मान्यवरांनी ध्वजाला मानवंदना दिली. दरम्यान, शाळेचा विद्यार्थी आराध्य चौधरी याने वाशिम येथे पार पडलेल्या कराटे स्पर्धेत देशभरातून आलेल्या खेळाडूंसोबत स्पर्धा करीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश चौधरी, राहुल सातभाई, संतोष दामोशन, राहुल सराफ, जयंत पारवेकर, पवन इनामदार उपस्थित होते कराटेच्या प्रशिक्षिका अयोध्या पवार यांचे आराध्य यास मार्गदर्शन लाभले आहे......
0 टिप्पण्या