🌟तर उर्स कमेटीच्या कार्याध्यक्षपदी युसूफ खान अहमद खान यांची सर्वानुमते निवड🌟
पुर्णा (दि.३० जानेवारी) - पुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्वधर्मीयांचे ग्रामदैवत असलेल्या हजरत मस्तान शाहवली दर्गाहच्या उर्सा निमित्त उर्स कमेटी स्थपने संदर्भात पुर्णा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष हाजी कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली दि.२४ जानेवारी २०२४ रोजी बैठीकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजित बैठकीमध्ये व शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा पठाण यांची सर्वानुमते अध्यक्षपदावर निवड करण्यात आली यावेळी गतवर्षीचे उर्स कमेटी माजी अध्यक्ष मुजीब पठाण,नगरसेवक अमजद नुरी,सोहेल पठाण,अनीस कुरेशी,शफी कुरेशी,इब्राहीम पठाण, इफ्तेखार कुरेशी आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती यावेळी उर्स कमेटीच्या कार्याध्यक्ष पदावर युसूफ खान अयमद खान,उपाध्यक्ष पदावर रफीक कुरेशी व शेख इमरान शेख सलीम, कोषाध्यक्ष पदावर जाकीर पठाण, सचिव पदावर मुखीद कुरेशी तर सदस्य पदावर शफी कुरेशी यांची निवड करण्यात आली यावेळी सोहेल पठाण,मतीन अशमी,गफार कुरेशी, जावीद पठाण,मतीन कुरेशी,मलिक कुरेशी, अरबाज बागवान आदींची उपस्थिति होती.....
0 टिप्पण्या