🌟परभणी जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व : भारतीय जनता पार्टीच्या केवळ चार सदस्यांचा समावेश....!



🌟एकूण सदस्यांची संख्या १८ यात राष्ट्रवादीचे ०८,शिवसेनेचे ०६ तर भाजपाच्या ०४ सदस्यांचा समावेश🌟 

परभणी : परभणी जिल्हा शिवसेनेचा निर्विवाद बालेकिल्ला परंतु हा बालेकिल्ला पक्षात घुसखोरी केलेल्या घुसखोरांमुळे आणि काही संधिसाधूंमुळे मागील अडीच दशकांपूर्वीचा काळ वगळता हळुवारपणे ढासळत चालल्याचे निदर्शनास येत असून हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका शब्दावर धनुष्य बानावर वनसाईट मतदान करणारा इमानदार मतदार व पक्षनिष्ठ तत्वनिष्ठ शिवसैनिकांचा वेळोवेळी भ्रमनिरास झाल्यामुळे आता हा बालेकिल्ला ढासळत चालल्याचे निदर्शनास येत असून त्यातच शिवसेनेत पडलेली फुट व याफुटी नंतर तरी पक्षातील निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु यानंतर देखील निष्ठावंत शिवसैनिकांना घुसखोर संधीसाधूंची चाखरी घरच्या दुरडीतली भाकरीच पदरात पडल्याचे पहावयास मिळत असल्याने अशा परिस्थितीत देखील शिवसेनेच्या दोन्ही गटांचे पक्षनेतृत्व पक्षाच्या पुनर्बाधणीसाठी उदासीन असल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळत असल्याचे नियोजन समितीवरील नियुक्त्यांवरुन निदर्शनास येत असून परभणी जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे नियोजन विभागाने मंगळवार ३० जानेवारी रोजी आणखीन नऊ सदस्यांच्या नियुक्त्या केल्या असून त्यामुळे एकूण सदस्यांची संख्या १८ एवढी झाली आहे. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे ०८, शिवसेनेचे ०६ व भाजपाच्या केवळ ०४ सदस्यांचा समावेश आहे.

        जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे क्रिडामंत्री संजय बनसोडे यांनी गेल्या महिन्यात जिल्हा नियोजन समितीवरील नऊ सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. त्यात भारतीय जनता पार्टीच्या चार कार्यकर्त्यांचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4 व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका सदस्याचा समावेश केला होता. त्याचवेळी शिवसेनेच्या शिंदे गटाने त्या नियुक्त्यांवर आक्षेप नोंदवला. विशेषतः शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रविण देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेवून या नियुक्त्या निदर्शनास आणून दिल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना या समितीत न्याय मिळाला नाही, असे स्पष्ट केले. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष अधिकाराचा वापर करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर हितगुज केले व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीवर मंगळवारी एकूण 9 जणांचा नव्याने समावेश करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला. आता या समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 8 सदस्यांचा, पाठोपाठ शिवसेनेच्या 6 तर भाजपाच्या 4 सदस्यांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. गंगाखेडातील राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पक्षास कितपत न्याय मिळाला हे कळू शकले नाही.

       दरम्यान, मंगळवारी नियोजन समितीत निमंत्रीत सदस्य म्हणून निमंत्रीत केलेल्या सदस्यात ज्ञानोबा महादू वावळे (शेंडगा ता. गंगाखेड), प्रविण बाळासाहेब देशमुख (परभणी), चक्रधर नरहरी उगले (सिमूरगव्हाण ता. पाथरी), सर्जेराव किसनराव गिराम (बाभूळगाव ता. पाथरी), माजी खासदार सुरेश रामराव जाधव (परभणी), राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप भास्करराव देशमुख (परभणी), हुसैनी सय्यद इम्राण हुसैनी सय्यद खुदादाद (परभणी), मिलींद खिल्लारे (परभणी) व सौ. भावना अनिल नखाते (पाथरी) यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या