🌟पुर्णा तालूक्यातील मौ.कान्हेगाव येथे महादेव मंदिर ते कौडगाव पानंद रस्त्याच्या कामाला सुरुवात....!


🌟या प्रसंगी सरपंचांनी सदर रस्ता लवकरच मंजूर करून मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले🌟 

पुर्णा (दि.२७ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील मौजे कान्हेगाव येथील महादेव मंदिर ते कौडगाव पानंद रस्ता सभोवतालच्या सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीसह पुढाकारातून मातीकाम सुरू करण्यात आले. मागील पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळापासूनची रस्त्याच्या कामाची मागणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व सर्वसहमतीने मार्गी लावून सदर रस्ता शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून माती कामासाठी सुरू करण्यात आला. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी कान्हेगावचे सरपंच सौ.रुक्मिणीबाई प्रकाशराव बोकारे यांच्याकडे रस्ता मजबुतीकरणाची मागणी केली.

या प्रसंगी सरपंचांनी सदर रस्ता लवकरच मंजूर करून मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे सांगितले. या रस्ता मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाल्यास परिसरातील सर्व शेतकऱ्यांना होणारी गैरसोय दूर होऊन शेतकऱ्यांना ऊस वाहतूक व इतर शेती विषयक बाबींसाठी याचा फायदा होणार आहे. रस्ता भूमिपूजन प्रसंगी परिसरातील शेतकरी म्हणून सरपंच सौ.रुक्मिणीबाई प्रकाशराव बोकारे, संजय नवघरे, सुरेशराव बोकारे, श्रीरंग बोकारे, मोतीराम बोकारे, नारायण बोकारे, दत्तराव नवघरे, अच्युत वानखेडे, नामदेव नवघरे, पांडुरंग मोरे, सखारामजी काळे, ज्ञानदेव काळे, संभाजी काळे, भुजंगराव नवघरे, सखारामजी नवघरे, भानुदास पारटकर, बालाजी पारटकर, अनंतराव पारटकर, प्रताप नवघरे, भुजंग पारटकर, वैजनाथ पारटकर, बालाजी बोकारे, संभाजी वाघमारे, बंडू पारटकर, संभाजी पारटकर ,ज्ञानदेव पारटकर, मारोतराव पारटकर भोजाजी पारटकर, दामोधर पारटकर दिलीप घोडके, महिला शेतकरी व इतर सन्माननीय ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या