🌟जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक भिती चित्रकांचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले🌟
परभणी (दि.17 जानेवारी) : उप प्रादेशिक परिवाहन कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा विषयक भितीचित्रकांचे (दि. 15) फित कापुन उद्घाटन करण्यात आले. तसेच कार्यालयामार्फत ही भित्तीचित्रे नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यात (दि. 15) पासुन सुरक्षीत रस्ते प्रवासाबाबत जनजागृती प्रशिक्षण व प्रचार, नेत्रतपासणी आरोग्य शिबीर, फर्स्ट एड आणि सीपीआर प्रशिक्षण, आग प्रतिरोधक प्रशिक्षण, गाव तेथे रस्ता सुरक्षा प्रशिक्षण, अपघात प्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण व उपाय योजना, ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह तपासणी मोहीम, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण शिबीरे असे विविध कार्यक्रम महिन्याभरात पार पडणार आहेत, त्याच बरोबर वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणा-या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
तरी पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजुने चालावे, मोटार सायकल चालविताना नेहमी आयएसआय मार्क हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहन अतिवेगाने चालवू नये, वाहन चालविताना सिटबेल्टचा वापर करावा व कोणतेही वाहन मद्यधुंद अवस्थेत चालवू नये, रस्ता सुरक्षेचे नियम पाळावे व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे.......
*****
0 टिप्पण्या