🌟परभणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या हसनापूर येथील विशेष युवती शिबीरात जनार्धन आवरगंड बोलत होते🌟
मोठेपणाच्या आहारी न जाता अवाजवी खर्च टाळत मुलीचे लग्न करा.शेती आणि शेतकरी यांचा विचार करा.पिकावू जमिनीवर प्लाटींग करु नका.पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या.काटकसरीनं आपला संसार सुखाचा करत कुटुंबाला समृध्द बनवा असे प्रतिपादन प्रयोगशील शेतकरी जनार्दन आवरगंड यांनी केले.
कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या हसनापूर येथील विशेष युवती शिबीरात जनार्धन आवरगंड बोलत होते.व्यासपीठावर सेंद्रिय भाजीपाला संघाचे पंडितराव थोरात, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.अरुण पडघन, कार्यक्रम अधिकारी डॉ नसीम बेगम यांची उपस्थिती होती.
शेतीपूरक व्यवसायाचा आराखडा तयार करा.मागणी तसा पुरवठा करा.आम्ही गुणवत्तापूर्ण रानभाज्या, सेंद्रिय भाजीपाला यांची पारंपरिक पिकाशी जोड घातली, नवतंत्रज्ञानाचा वापर करत ऋतुमानानुसार शेतीपूरक विविध उद्योग सुरू केले. मी काशीफळा बरोबरच भोपळ्याची शेती सुरू केली आज परभणी जिल्हा भाजीपाला संघ त्याचा परिपाक असल्याचे मत मांडत शेती व शेतकरी समृद्ध कसा होईल हाच एक ध्यास असल्याचे पंडीत थोरात यांनी मत व्यक्त केले.....
0 टिप्पण्या